बेळगाव (वार्ता) : 11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आढावा घेऊन या आदेशात बदल करण्यात आला आणि इयत्ता 1 ते 9 वी साठी सोमवार 17 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. अथणी …
Read More »छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा
बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज यांचा 342 राज्याभिषेक दिनानिमित्त धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती यांच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी महाराज यांच्या मूर्तीला लोकप्रिय आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच पुजा करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती बेळगाव यांच्यावतीने …
Read More »एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन
बेळगाव (वार्ता) : म. ए. समितीचे माजी नगरसेवक आणि एपीएमसी माजी अध्यक्ष, कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रात्री साडे नऊ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …
Read More »स्वामी विवेकानंद हे भारतातील पहिले समाजवादी : प्राचार्य डॉ. आनंद मेणसे
प्रगतिशील लेखक संघ आणि साम्यवादी परिवारतर्फे आयोजन : 159 वी स्वामी विवेकानंद जयंती साजरी बेळगांव (प्रा. एन. एन. शिंदे) : पारंपारिक विचारांना फाटा देऊन सामाजिक आणि वैज्ञानिक दूरदृष्टीकोणाचा पुरस्कार केला. भाषा ही माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते; बंगाली, इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांवरील असामान्य प्रभूत्वामुळे जगावर प्रभाव स्वामी विवेकानंद यांनी …
Read More »सुवर्ण विधानसौध समोर सामूहिक सूर्यनमस्कार
बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव सुवर्ण विधानसौधसमोर आज शुक्रवारी आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सदर उपक्रमाचे उद्घाटन बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते झाले. …
Read More »खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात डांबण्यात आलेल्या शिवभक्तांची मुक्तता करावी
शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी बेळगाव (वार्ता) : खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात डांबण्यात आलेल्या शिवभक्तांची मुक्तता करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान केल्यानंतर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमधील …
Read More »कोरोनाचे नियम पाळून हुतात्मा दिन; प्रशासनाची परवानगी
बेळगाव (वार्ता) : कोरोनाचे नियम पाळून 17 जानेवारी रोजी सकाळी हुतात्मा चौकात हुतात्मा दिन पाळावा अश्या सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केल्या आहेत. शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळाने हिरेमठ यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …
Read More »शाळांच्या निर्णयाचा फेरविचार करा
बेळगाव सिटीझन कौन्सिलच्यावतीने मागणी बेळगाव (वार्ता) : कोरोना आणि ओमिक्रॉनचा वाढता कहर तसेच सध्याचे थंडीचे मुलांच्या आजारांना निमंत्रण देणारे वातावरण याचा गांभीर्याने विचार करून बेंगलोरप्रमाणे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील शाळा येत्या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवाव्यात. यासाठी येत्या 17 जानेवारी रोजी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्ग सुरू करण्याच्या आपल्या आदेशाचा पुनर्विचार …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा तालुका समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव (वार्ता) : मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासणार्या समाजकंटकांच्या सत्काराचा निषेध करण्याबरोबरच येत्या 17 जानेवारी रोजी कोरोनाचे नियमासह हुतात्मा दिन गांभीर्याने आचरणात आणून कडकडीत हरताळ पाळण्याचा ठराव बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. शहरातील खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे आज दुपारी …
Read More »यावर्षीही प्रजासत्ताक दिन सोहळा साधेपणाने : जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ
बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकरणांची वाढती संख्या पाहता, यावर्षीचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा साधेपणाने आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज गुरुवारी (१३ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी सर्वांशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta