बेंगळुरू : खानापूरच्या आम. डॉ अंजली निंबाळकर यांनी आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली. यावेळी आम. निंबाळकर यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील विविध समस्या आणि विकासकामासंदर्भात चर्चा ही केली. खानापूर मतदार संघातील विविध समस्या त्याचबरोबर नियोजित विकासकामे यासंदर्भात चर्चा करतानाच प्रामुख्याने …
Read More »खानापूर विद्यानगरात रस्त्याची बोंब, नगरपंचायत लक्ष कधी देणार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्त्याची बोंब झाली आहे. रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी म्हणण्याची वेळ विद्यानगरातील रहिवाशाना आली आहे. मात्र याकडे नगरपंचायत, नगरसेवक डोळे झाक करत आहेत. खानापूर शहराचा कायापलट होणार असे भविष्य वर्तविण्यात येत आहे. शहरातील रस्त्याची दुरूस्ती, त्याचबरोबर उपनगरातील विद्यानगरात सध्या रस्त्याची महाभयंकर अवस्था …
Read More »नुतन मुख्यमंत्र्यांचे खानापूर भाजपकडून अभिनंदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने कर्नाटक राज्याचे २३ वे नुतन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे बेगळूर येथे जाऊन अभिनंदन केले. व खानापूर तालुक्यातील विकास कामाबद्दल निवेदन सादर केले.मुख्यमंत्री बसराज बोम्माई यांनी नुकताच शपथविधी घेतल्यानंतर खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेंगळुरूला जाऊन मुखमंत्री बसवराज बोम्माई व मुरगेश निराणी यांना पुष्पगुच्छ देऊन …
Read More »तालुक्याच्या प्रत्येक ग्रा. पं.तीत होणार कचरा डेपोचे आयोजन
खानापूर (सुहास पाटील याजकडून) : खानापूर तालुक्यात एकूण ५१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी ३८ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ३ एकर जमिनीत हा कचरा डेपोचे आयोजन करण्यात येणार आहे.यापैकी नंदगड ग्राम पंचायतीने कचरा डेपो कामाचा शुभारंभ केला असून याठिकाणच्या कचरा डेपोत गावातील प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाॅटल, कचरा असा वेगळा केला जातो. …
Read More »सेवानिवृत्तीनिमित्त बुवाजी व गुरव यांचा सत्कार
बेळगाव : हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कुल येथील मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तर बडकू गुरव हे ४४ वर्षांच्या प्रदीप सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्याबाबत त्यांचा शाळा सुधारणा कमिटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बुधवारी बुवाजी व गुरव यांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूरातून गुरव गल्ली व घाडी गल्लीतून पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य …
Read More »हाळ झुंजवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या धक्कादायक
खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका प्रशासन कोणताच ठोस निर्णय घेण्यास तयार नाही.त्यामुळे अशा कर्जबाजारीला शेतकरी कंटाळून आणि अनेक संकटाना त्रासुन गळफास घेणे, किटकनाशक प्राशन करणे, नदीत उडी मारून जीव देणे असे प्रकार घडतात. मात्र यामागचे कारण तालुका प्रशासन शोधुन …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास खानापूर मराठी पत्रकार संघाचा पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूर मराठी पत्रकार संघटनेचा पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार सहकार्य …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमाला खानापूर वकील संघटनेचा पाठिंबा
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित …
Read More »अखेर खानापूर शहराचा पाणी पुरवठा पूर्वपदावर, नगरपंचायतीचे प्रयत्न
खानापूर (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून खानापूर शहराचा पाणीपुरवठा विद्युत मोटारीत बिघाड होऊन बंद पडल्यामुळे ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्याची वेळ शहरवासीयाना आली. त्यानंतर नगरपंचायतीने दुरूस्तीचे काम हाती घेतले व पाणीपुरवठा पूर्वपदावर आला. याबाबतची हकीकत अशी की,नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यासह शहराला पाणीच पाणी करून सोडले. त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणात पाण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta