खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भुरूणकी ग्राम पंचायतीच्या कामकाजाबद्दल युट्युब चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन ग्राम पंचायतीची बदनामी करणारे जोतिबा भेंडीगिरी व परशराम कोलकार यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भुरूणकी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मुबारक कित्तूर, उपाध्यक्षा विद्या महेश पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्यांनी मंगळवारी दि. ८ रोजी खानापूर येथील जिल्हा …
Read More »थकीत ऊस बिलासंर्भात लैला साखर कारखान्याला खानापूर युवा समितीच्यावतीने उद्या निवेदन!
खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15 नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत, त्यानंतर पाठविलेल्या ऊसांची बिले मात्र आजतागायत जमा करण्यात आलेली नाहीत. तरी लैला साखर कारखाना व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावीत यासंदर्भात कारखाण्यावर खानापूर युवा …
Read More »जांबोटी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
खानापूर : जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील रामपूर पेठ श्रीराम मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी …
Read More »खासदार फंडातून निडगल गावच्या रस्त्याचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडगल (ता. खानापूर) गावच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून निडगल गावला जोडणाऱ्या रस्त्याचे भुमीपूजन भाजप नेते शरद केशकामत यांनी केले. यावेळी निडगल गावच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे निडगल गावाला रस्ता दुरूस्तीची नितांत गरज …
Read More »घोटगाळीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इरफान तालिकोटीच्यावतीने मोफत डान्स स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळीत (ता. खानापूर) येथे काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने खास १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मोफत तसेच ओपन गटासाठी ग्रुप डान्स, सोलो डान्स, करीओके गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते इरफान तालिकोटी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले …
Read More »गंदिगवाडातील वासरांच्या प्रदर्शनात ४२ वासरांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाडातील (ता. खानापूर) येथे खानापूर पशु खात्याच्यावतीने विविध जातीच्या वासराचे प्रदर्शन नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंदिगवाड ग्राम पंचायत अध्यक्षा मल्लवा नायकर होत्या. तर प्रमुख म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन घाळी, ग्राम पंचायत सदस्य जगदिश मुलिमनी, महावीर हुलकवी, लक्ष्मण कोकडी, हुवाप्पा अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते. …
Read More »विद्युत तारांच्या घर्षणाने तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसाला आगी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका अशी खानापूर तालुक्याची ओळख आहे. मात्र खानापूर तालुका वाळू मिश्रीत जमिनीचा असल्याने केवळ भात आणि ऊस ही केवळ दोनच पिके घेतात. या ऊस पिकाला मात्र जंगली प्राण्यांची तसेच आगीची भय असूनही तालुक्यातील शेतकरी धाडसाने भात पिकांबरोबर ऊसाचे …
Read More »हलशी मराठी शाळेत पालक मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी एसडीएमसी अध्यक्ष श्रीकांत गुरव व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एल. डी. …
Read More »जांबोटीत खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेची मासिक बैठक आणि वार्षिक कॅलेंडर प्रकाशन सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेची मासिक बैठक प्राथमिक मराठी शाळा जांबोटी येथे शनिवारी दि. ४ रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील होते. तर व्यासपिठावर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर सन् २०२२सालाचे …
Read More »गर्लगुंजीच्या वेशीत बस शेडसाठी टाकलेल्या खड्डी, वाळूचा वाहतुकीला अडथळा
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या वेशीत नव्याने उभारण्यात आलेल्या बस शेडसाठी वाळू, खड्डी व इतर साहित्य लक्ष्मीमंदिराच्या समोर आणून टाकण्यात आले आहे. त्यातच बस शेडचेही काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या वाळू, खड्डी व इतर साहित्याची वाहतुकीला तसेच गावच्या नागरिकांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta