उचवडे : उचवडे ( ता. खानापूर) येथे बुधवार दि. 12 नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजता संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा खानापूर, बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील भजनी मंडळासाठी खुली आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये 15000, द्वितीय क्रमांक रुपये 12000, तृतीय क्रमांक रुपये 10000 अशी एकूण …
Read More »कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 : राजा शिवाजी बेळगाव संघाचा दणक्यात विजय
बेळगाव : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आज “राजा शिवाजी बेळगाव” संघाने धारवाड संघाचा धुव्वा उडविला. धारवाड संघाने प्रथम फलंदाजी करत ९ षटकात ८० धावांचे आव्हान दिले होते. परंतु राजा शिवाजी बेळगाव संघाने ५.४ षटकातच ८३ धावा ठोकत विजय साकार केला. उद्या संध्याकाळी ६ वाजता राजा …
Read More »कर्नाटका सॉफ्टबॉल प्रीमिअम लीग 2025 : डॉ. अंजलीताई फाउंडेशन पुरस्कृत “राजा शिवाजी बेळगाव” टीम बेंगलोर मध्ये दाखल …
खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल प्रिमीअम लीग ही राज्यस्तरावर खेळविली जाणारी स्पर्धा असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याला एक टीम आहे. बेळगाव जिल्ह्याच्या टीमचे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून ही टीम काल रात्री बेंगलोर येथे दाखल झाली आहे. टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फाउंडेशन खानापूर करत असून यावेळी ही टीम फायनल …
Read More »खानापूर तालुक्यात 61 हजार घरांना वीजमाफी, 64 हजार महिलांना दरमहा रु. 2 हजार; पंचहमी योजना समितीच्या बैठकीत माहिती
खानापूर : तालुका पंचायत सभागृहात बुधवारी तालुका पंचहमी योजना अंमलबजावणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध हमी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हेस्कॉमचे लेखा अधिकारी बी. ए. धरमदास यांनी सांगितले की, तालुक्यात गृहज्योती योजनेचे ६१,९९४ लाभार्थी असून, ऑक्टोबर महिन्यात १ कोटी ९९ लाख ५० …
Read More »इटगीतील ४० विद्यार्थ्यांच्या दाखल्याचा प्रश्न डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पुढाकाराने सुटला!
खानापूर : खानापूर तालुक्यातील इटगी येथील 40 विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याच्या दाखल्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न अखेर खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पुढाकाराने सुटला असून या 40 विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठीचा मार्ग सुखकर झाला आहे. या प्रकरणी खानापूर ब्लॉक काँग्रेस तसेच माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी अन्यायग्रस्त …
Read More »हेमाडगा शाळेत साजरा झाला “आजींच्या मायेचा सोहळा”
खानापूर : भीमगड अभयारण्यातील हेमाडगा सरकारी शाळेत ‘आजींच्या मायेचा सोहळा’ हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आजी-नातवंडांच्या प्रेमळ नात्याला सन्मान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्र येऊन हा सोहळा संस्मरणीय केला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताच्या गीताने व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा फुल देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख …
Read More »सुळेगाली गावातील हत्तींच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री ईश्वर खंड्रे यांचे चौकशीचे आदेश
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुळेगाली गावात विद्युतभारित विजेच्या तारांचा शॉक लागून दोन हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वनविभाग आणि वीज वितरण संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले असून कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून या घटनेची सखोल चौकशी करून …
Read More »खानापूर तहसीलदारांच्या तात्काळ बदलीचा उच्च न्यायालयाकडून आदेश
खानापूर : खानापूर तहसीलदार दुंडप्पा कोमार यांना एका आठवड्याच्या आत खानापूर तहसीलदार पदावरून मुक्त करावे आणि त्यांच्या जागी दुसऱ्या तहसीलदारांची नियुक्ती करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. एस. जी. पंडित आणि न्या. गीता के. बी. यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील विभागीय खंडपीठातून महसूल विभागाच्या सचिवांना यासंदर्भात …
Read More »विद्युत तारेच्या प्रवाहाचा धक्का लागून दोन हत्तींचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुलेगाळी या ठिकाणी विद्युत तारेच्या प्रवाहाचा धक्का लागून घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन जंगली हत्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेस्कॉम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवराई गावाजवळील सुलेगाळी येथील …
Read More »सीमाप्रश्नाची सोडवणूक हेच आमचे ध्येय : माजी आमदार दिगंबर पाटील
खानापूर तालुका समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर येथील शिवस्मारक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. उपोषणादरम्यान सभा देखील झाली यावेळी व्यासपीठावरून खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta