कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवरील रेणुका मंदिरात रेणुका यात्रा उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात नारळ, साखर, कापूर, उदबत्ती, आईस्क्रीम, भेळ आदीसह अन्य दुकाने थाटण्यात आली होती. प्रति वर्षी कोगनोळी येथील हजारो भाविक सौंदत्ती यल्लमा डोंगरावर …
Read More »हुक्केरी पोलीसांकडून २२५ ग्रॅम गांजा जप्त
यल्लीमन्नोळी फाट्यावर कारवाई संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलीसांनी सापळा रचून चोरीछुपे, बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणारे आरोपी अजय उर्फ अमर सुभाष कोळी (वय २४) राहणार तळवार गल्ली संकेश्वर, बबलू राजासाठी नाईकवाडी राहणार सोलापूर तालुका हुक्केरी यांच्याकडून लाल रंगाच्या प्लॅस्टिक कॅरी बॅगमधील २२५ …
Read More »’गोमटेश’मध्ये जागतिक विज्ञान दिन साजरा
निपाणी : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विज्ञान उपकरणांचे सादरीकरण केले. विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध मॉडेल्स या …
Read More »कल्पकतेला संधी देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनांची गरज
रेवती मठद : विज्ञान प्रदर्शनात कागलची पूर्वा माणगावे प्रथम निपाणी (वार्ता): प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जन्मत: एखादी अभूतपूर्व कला असते. त्याला संधी देण्याचे काम शाळा करते. शालेय अभ्यासातील प्रयोगातून विज्ञानाची गोडी वाढते. पण विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संधी मिळते. यासाठी प्रत्येक शाळांतून अशी प्रदर्शने भरविण्याची गरज असल्याचे मत, निपाणी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद …
Read More »संस्कार किराणा दुकानात विकत मिळत नाही : रमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : संस्कार किराणा दुकानात विकत मिळत नाही. आई-वडीलांनी मुलांना बालपणात संस्कार द्यावे लागतात. मुलांना शिक्षणाबरोबर संस्कारसंपन्न घडविण्याचे कार्य पालकांनी करायला हवे असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते निडसोसी महाशिवरात्री जात्रा महोत्सवात सहभागी होऊन बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम …
Read More »सौंदलगा येथे महाशिवरात्री भक्तीभावाने साजरी
सौंदलगा : येथील श्री महादेव मंदिरामध्ये सकाळी अभिषेक, रुद्राची अकरा आवर्तने, श्री सूक्त, 108 नामावली आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात झाले. या धार्मिक कार्यक्रमाच्या यजमानपदी डॉ. सुहास कुलकर्णी, नचिकेत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी हे होते. या सर्व धार्मिक विधीचे पौराहित्य मुकुंद जोशी, शशिकांत जोशी, अंबादास बावडेकर, प्रदीप जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, प्रसाद जोशी, …
Read More »लसीकरणाची गरज शासनालाच?
दुसर्या डोससह बुस्टर डोसला नकारघंटा कायम : केवळ 1756 बुस्टर डोस पूर्ण निपाणी (वार्ता) : तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज केवळ शासनाला असल्याचे विदारक चित्र सध्या निपाणी तालुका पाहण्यास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना नागरिकांकडून दुसर्या डोससह बुस्टर डोस घेण्यास नकार घंटा असल्याचे चित्र …
Read More »जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञानची भुमिका महत्त्वाची : सरोज पाटील
कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान सोहळा निपाणी (वार्ता) : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. विज्ञानामुळे आपली जीवनशैली अधिक सुखकर झाली. दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही. विज्ञानाने अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. विज्ञान व जीवन या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात …
Read More »संकेश्वरजवळ मोटारसायकल अपघातात चौघांचा मृत्यू
मौजमजेची पार्टी पडली महागात.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जवळील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर निपाणीहून संकेश्वर अनंतविद्यानगरकडे भरवेगात येणाऱ्या मोटारसायकलचा ताबा सुटून खड्ड्यात जोराने कलंडून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तिघे मित्र जागीच ठार झाले असून एकाचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघात गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पावणेबाराच्या दरम्यान …
Read More »डी. के. शिवकुमार यांच्यामुळेच हर्षची हत्या : आमदार पी. राजीव
चिक्कोडी : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बेजबाबदार आणि चिथावणीखोर विधानामुळेच शिमोग्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ता हर्ष याची हत्या झाल्याचा घणाघाती आरोप रायबागचे आ. पी. राजीव यांनी केला. चिक्कोडीतील जयप्रकाश नारायण सभागृहात भाजपतर्फे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आ. पी. राजीव यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta