संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी विधानसभा आखाड्यात उतरणार आणि विजयी होणार यात तीळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, हुक्केरी विधानसभा जिंकणे हे आपले लक्ष्य आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी आशीर्वाद केला होता पण बॅडलक आपल्याला पराभव पत्करावा लागला. 2023 ची निवडणूक तशी मोठी …
Read More »अशोभनीय वक्तव्य करणार्या मंत्र्यावर कारवाई करा
चिकोडी जिल्हा काँग्रेस : राज्यपालांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील भाजपा सरकारचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे राष्ट्रध्वज तिरंग्याच्या स्थानी भगवा ध्वज फडकाविण्याचे वक्तव्य भारतीय संविधानाचे आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे आहे. त्यांच्यावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन निपाणी व बेडकिहाळ भाग काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना …
Read More »चिक्कोडी प्रांताधिकारीपदी संतोष कामगौडा रुजू
चिक्कोडी (वार्ता) : मूळचे चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर गावचे रहिवासी आणि 2014 च्या तुकडीचे केएएस अधिकारी संतोष कामगौडा यांनी चिक्कोडी प्रांताधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संतोष कामगौडा यांनी आधी प्रशिक्षणार्थी म्हणून व नंतर विविध ठिकाणी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. रायचूर येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आपल्या …
Read More »राष्ट्रपुरुषांच्या अवमानप्रकरणी चिक्कोडीत आंदोलन
चिक्कोडी : समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचा अवमान करण्यात आल्याच्या विरोधात चिक्कोडी येथे कुरबर समाजाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, विश्वगुरू बसवेश्वर यांच्या प्रतिमांचा अवमान आणि विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज चिक्कोडी तालुका कुरबर संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणार्या दुष्कर्म्यांना अटक …
Read More »रयत संघटनेच्या मोर्चाला अखेर यश
राजू पोवार : मंगळवारी होणार मंत्री महोदयांशी बैठक निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करावे, अतिवृष्टी व महापुरात झालेल्या पिकांना भरपाई मिळावी, शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या ऊसाला भरपाई दिली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव …
Read More »पाठबळ नसतानाही मतदारांमुळे जारकीहोळी विधानपरिषदेत : युवा नेते उत्तम पाटील
मतदारांसह कार्यकर्त्यांचे मानले आभार निपाणी (वार्ता) : कोणत्याही वरिष्ठ नेतेमंडळींचे पाठबळ नसताना केवळ मतदार व कार्यकर्त्यांमुळेच अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विजयी झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच जारकिहोळी हे विधानपरिषदेत पोहचले आहेत. त्यांच्या वतीने मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी भागात …
Read More »देशाचा अभिमान बाळगण्याचे ध्येय ठेवा
निवृत्त कर्नल शिवाजी बाबर : निपाणीत लेफ्टनंट रोहित कामत यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : नेतृत्व करण्याची ताकद फार मोठी आहे. युवावर्गाची विविध क्षेत्रातील भरारी पाहता अभिमानाने छाती फुलते. देशसेवेत निपाणी तालुक्यातील अनेक जवानांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. युवावर्गाने आपल्या नेतृत्वातून देशाचा अभिमान वाढविण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे, जिद्द …
Read More »लखन जारकीहोळी यांच्या विजयाने उत्तम पाटील यांचा करिष्मा अधोरेखित
निपाणी मतदारसंघातील वर्चस्व सिध्द : विधानसभेची तयारी निपाणी (विनायक पाटील) : नुकतीच पार पडलेली विधानपरिषद निवडणूक बेळगाव जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. 2 जागांसाठी 3 मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने बेळगावी ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेल्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण करणारे आमदार रमेश जारकीहोळी …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा
राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब …
Read More »बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत जारकीहोळी जिंकले.. भाजप हरले..
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत खर्या अर्थाने जारकीहोळी जिंकले, भाजप हरले असेच म्हणावे लागेल. जारकीहोळी बंधुंनी पुन्हा एकदा आपली ताकद राज्यातील सत्तारुढ सरकारला दाखवून दिली आहे भाजपाने जारकीहोळी यांना विधानपरिषदची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषदच्या आखाड्यात अपक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta