निपाणी : चिक्कोडी जिल्हा शिक्षण केंद्र निपाणीमधील शैक्षणिक संस्थेमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्याकडून जी फी व्यतिरिक्त ज्यादा रक्कम घेतली जात असल्याने सर्व शाळेत पालकांना दिसण्यासारखे फी चे संदर्भात माहिती फलक डिजिटल बोर्ड लावण्यासंदर्भात अनेक वेळा निपाणी बी.ई.ओ. यांना तक्रार केली असून त्यावर योग्य ती कार्यवाही बी.ई.ओ. केली नसल्याने फोर जे आर …
Read More »आरक्षणाशिवाय मराठ्यांच्या प्रगतीचा मार्ग नसल्याचे निपाणीतील बैठकीतील मत
निपाणी (वार्ता) : राज्यातील मराठा समाजाच्या जातनिहाय गणनेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य, खरी माहिती द्यावी. सहभाग टाळल्यास मराठा समाजाचे नुकसान होईल, असा इशारा विधानपरिषद सदस्य आमदार एम. जी. मुळे यांनी दिला. येथील सकल मराठा समाजतर्फे बुधवारी (ता.१७) मराठा मंडळात आयोजित मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी …
Read More »निपाणीत ३ ऑक्टोबरपासून दर्गाह उरूस
उरूस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई- सरकार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित येथील श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा उरूस बाबा महाराज चव्हाण यांच्या वारसांच्या तर्फे श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा भव्य उरूस शुक्रवार पासून ( …
Read More »सकाळी मोर्चा, दुपारी निर्णय : सुवर्णमध्य साधून समस्यावर तोडगा; गाळेधारकातून समाधान
निपाणी (वार्ता) : निपाणी येथे नगरपालिकेतर्फे सन १९६० पासून आजपर्यंत विविध ठिकाणी ४३० गाळे बांधून व्यवसायिकांना भाडेतत्त्वावर दिले आहे. दरवेळी परवाना नूतनीकरण करून गाळे दिले. सध्या फेरलिलाव करण्यासाठी गाळे ताब्यात देण्याची नोटीस पालिकेने दिली. पूर्वीप्रमाणे नूतनीकरण देण्याच्या मागणीसाठी गाळेधारकांनी सोमवारी (ता.१५) नगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन दिले. त्यानंतर दुपारी नगरपालिका …
Read More »मुख्यमंत्र्यामुळेच मौलाना आझाद इंग्लिश मीडियम स्कूल
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळेंची माहिती; शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : येथे २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात २५० मौलाना आझाद इंग्लिश मीडियम स्कूल ला मंजुरी दिली होती. २०५-२६ या शैक्षणिक सालात १०० अशा शाळा सुरू करण्यासाठी लागणारे अनुदान, शिक्षक वर्ग, फर्निचर, इमारत, भाडे अशा सर्व सुविधा पुरविल्या …
Read More »नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास कार्यकर्त्यांचा पुढाकार
निपाणी (वार्ता) : नगरपालिकेच्या नगरोत्थान योजनेतून येथील धर्मवीर छत्रपती न्यु संभाजीनगर परिसरातील रस्ते, गटारी आणि सार्वजनिक शौचालयांची कामे करावीत, अशी वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरुण मंडळाने थेट रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचा उपक्रम …
Read More »मुख्यमंत्री सहायता निधीतून शेटके यांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत
निपाणी (वार्ता) : येथील विनायक शेटके यांच्या मातोश्रीवर कोल्हापूर येथील अस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपये इतका होता. यावेळी आर्थिक मदतीसाठी विनायक शेटके यांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष निलेश हत्ती यांची भेट घेतली. त्यानुसार संबंधित कुटुंबीयांना महाराष्ट्र येथील मुख्यमंत्री …
Read More »महात्मा गांधी रुग्णालयामधील डायलिसिस मशीन धूळखात!
निपाणी : येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये किडणी आजार रुग्णांच्या सोयीसाठी डायलिसिसची नवीन ६ मशीन आलेली आहेत. अनेक महिने जोडणीच्या नावाखाली मशीन तशीच पडून आहेत. त्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती डायलिसिस रुग्णांची झाली आहे. तरी आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देऊन तत्काळ मशीन जोडण्याची मागणी डायलिसिस रुग्णांतून होत आहे. …
Read More »राष्ट्रचिन्हाचा अवमान करणाऱ्या कृत्यावर कठोर कारवाई करा
विविध हिंदुत्ववादी संघटनांची मागणी; तहसीलदारांमार्फत वरिष्ठांना निवेदन निपाणी(वार्ता) : जम्मू आणि काश्मीर राज्यातील हजरतबल दर्यातील मुख्य प्रार्थनागृहाबाहेर असणाऱ्या फलकावरील भारताचे राष्ट्रचिन्ह ‘अशोक स्तंभ’ काही धर्मांध आणि देशविघातक घटकांनी तोडून टाकले आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या गैरकृत्यामुळे भारतीय अस्मिता, संविधान आणि सार्वभौमत्वावर केलेला थेट हल्ला आहे. …
Read More »जैन बोर्डिंगच्या श्रीनिकेतन शाळेतर्फे सहकाररत्न डॉ. कुरबेट्टी यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा व शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूलचे संस्थापक डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांना सहकार रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त शांतिनिकेतन हायस्कूलचे अध्यक्ष कपूरचंद इंगळे, डॉ. अनिल ससे, संचालक मिलिंद चौगुले, सेक्रेटरी प्रदीप पाटील आणि शिक्षकातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta