Monday , September 21 2026
Breaking News

प्रजासत्ताक दिनामुळे निपाणी बाजारपेठ तिरंगी

Spread the love

 

सजावटीचे साहित्यांचा रेलचेल; १०० ते १००० रुपयांपर्यंत कापडी ध्वज उपलब्ध

निपाणी (वार्ता) : प्रजासत्ताक दिनानिमित्त निपाणी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा व शाळांच्या परिसरात देशभक्तीची झळाळी दिसून येत आहे. ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली असून नागरिकांकडून त्यांची खरेदी केली जात आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी क्रांतिकारी महापुरुषांच्या वेशभूषा, तिरंगा ध्वज, बँजेस, मेटलबेंज, तिरंगी मफलर, टोपी, गांधी टोपी, तिरंगी कानटोपी, भारतीय विविधता दर्शविणारे शर्ट, तिरंगी टी-शर्ट, लहान मुलींसाठी फ्रॉक, डोक्याच्या रिबीन्स, हातात घालायचे तिरंगी बैंड आणि कपाळावरील बँड अशी विविध उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.
घरगुती व कार्यालयीन सजावटीसाठी तिरंगी रंगांतील तोरणे, पताका, कागदी तोरणे, डिझाइन केलेले कटआउट्स इत्यादी साहित्य स्वस्त दरात विक्रीस ठेवण्यात आले आहे. यंदा तिरंगी ध्वज अतिशय माफक दरात उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कागदी तिरंगी ध्वज ५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत, तर कापडी ध्वज १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तिरंगी टी-शर्ट २०० रुपयांपासून, मुलींसाठी फ्रॉक ३०० रुपयांपासून विक्रीस आहेत. सजावटीचे साहित्य जोडीने ८० ते १५० रुपयांपर्यंत आहे. बेंजेस २० रुपये, मेटल बेंज ५० रुपये, तिरंगी मफलर ४० रुपये, टोपी ६० रुपये, गांधी टोपी ३५ रुपये आणि तिरंगी कानटोपी ६० रुपयांना उपलब्ध आहेत. सध्या निपाणी बाजारातील दिवसाची उलाढाल किमान ८ ते १० हजार रुपयांपर्यंत असून येत्या दोन दिवसांत विक्री आणखी वाढेल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
—————————————————————-
‘ ग्राहकांच्या मागणीनुसार यंदा बेळगाव जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे गदग, हुबळी व चित्रदुर्ग येथून जिल्ह्यातील १६ शाखांद्वारे ध्वजाची मागणी केली आहे. याशिवाय शाल, हँडचेनचीही उपलब्धता केली आहे. प्रजासत्ताक दिनापासून पुढील १०८ दिवस खादी खरेदीवर ३५ टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे.’
-श्रीकांत पाटील,
व्यवस्थापक खादी ग्रामोद्योग विक्री केंद्र, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *