Thursday , December 11 2025
Breaking News

निपाणी

‘अरिहंत’च्या विद्यार्थ्यांची राज्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

व्यवस्थापकांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार :२५ विद्यार्थ्यांचे यश निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून चेअरमन उत्तम पाटील व संचालिका मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील म्हणाले, सीमाभागासह ग्रामीण …

Read More »

बेनाडीतील मधाळे परिवाराकडून अनाथ निराधारांना जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कमेची मदत

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मधाळे परिवाराकडून भारतीय समाज सेवा संस्था, देवांश मनुष्य समाजसेवा निराधारांचा आधार, मत्तिवडे (ता. निपाणी) या संस्थेला वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम मदत स्वरूपात देण्यात आली.  राजू मधाळे म्हणाले, आमच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, घरामध्ये वडिलांच्या फोटोचे पूजन करून नैवेद्य दाखवून, …

Read More »

करनूरमध्ये एका परप्रांतीयाचा ओढ्यातून वाहून मृत्यू

  कोगनोळी : करनूर तालुका कागल येथे कुमार विद्यामंदिर मराठी शाळे जवळील ओढा ओलांडताना मुकेश राजेश शर्मा वय वर्ष 22 राहणार मगदापूर खिरी, मोहम्मद उत्तर प्रदेश या परप्रांतीयाचा वाहून जाऊन  मृत्यू झाला. कोगनोळी टोलनाक्याच्या पुढे अपघात झाल्यानंतर लोक मारतील या भितीने सैराभैर होहुन दोन परप्रांतीय रस्ता मिळेल तिकडे धावत सुटले. …

Read More »

काम छोटे मोठे नसून त्यात मिळणारा आनंद महत्वाचा

  संजय देसाई : दोशी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन निपाणी (वार्ता) : कोणतेही काम छोटे-मोठे नसते किंवा कमी अधिक महत्त्वाचे नसते तर त्यामधून मिळणारा आनंद आणि सेवेचे समाधान मोठे असते, असे उद्गार निपाणी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक संजय देसाई यांनी काढले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर (ता. कागल) शाळेत डॉ. ए. …

Read More »

हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची गर्दी

  चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवार तारीख 11 रोजी कुर्ली, आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार …

Read More »

’अरिहंत’मध्ये इराकच्या बाळाला जीवदान!

  बेळगावात शस्त्रक्रिया : डॉ. एम. डी. दीक्षित यांना यश निपाणी (वार्ता) : अवघ्या दोन वर्षाच्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच धक्का बसलेल्या पालकांनी सातासमुद्रापार इराकहून बेळगाव गाठले. येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी यशस्वी शखक्रिया करून त्या चिमुकल्याला जीवदान दिले. त्यासाठी बोरगाव येथील युवा उद्योजक …

Read More »

प्राथमिक कृषी पत्तीन संघाकडून ट्रॅक्टरचे वितरण

  सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला ट्रॅक्टरचे पूजन चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते होऊन संचालक आप्पासाहेब ढवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यानंतर बोलताना चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, संघाचे सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील …

Read More »

ऊसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये घेणारच

  रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार : १५ ला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटकासह महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. बेळगाव जिल्ह्यात खासगी आणि सहकारी तत्त्वावरील लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय आणि उद्योगपतींचे २९ साखर कारखाने आहेत. त्यांच्यात एकजूट असल्याने आज तागायात कुणीही दर जाहीर केलेला नाही. दर जाहीर केल्या …

Read More »

महाराष्ट्रातून विक्रीसाठी आलेला अर्धा किलो गांजा जप्त

  निपाणी पोलिसांची कारवाई : आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातून दुचाकीवरून कर्नाटकात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका युवकाला मोठ्या शिताफीने निपाणी पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना मंगळवारी (ता.११) घडली. अमीर बशीर जमादार (वय २१ राहणार तेरवाड ता. शिरोळ) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे सहा हजार रुपये …

Read More »

समस्या संपवण्यासाठी राज्य नोकर संघ कार्यरत

  राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी : निपाणीत सरकारी नोकर संघाची सभा निपाणी (वार्ता) : सरकारी कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी संघटनेने काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. आपण नेहमीच सीमावाशीय सरकारी नोकरांच्या पाठीशी आहोत. या पुढील काळात सरकारी नोकरांनी जागृत राहून काम …

Read More »