
युवा नेते उत्तम पाटील :१४ वा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सुदृढ होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, या उद्देशाने सहकार नेते रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक कृषी संघामार्फत अरिहंत गारमेंट ची स्थापना करण्यात आली. सुमारे या ठिकाणी गेल्या १४ वर्षापासून १०० हून अधिक महिलांना रोजगार दिला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होत असल्याचे मत अरिहंत गारमेंटचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
येथे श्री अरिहंत गारमेंट्सचा चौदावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संचालिका मीनाक्षी पाटील यांनी, अरिहंत परिवाराकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचा लाभ प्रत्येक महिलांनी घ्यावा. कुटुंब प्रमुख म्हणून आज महिला सक्षमपणे काम करीत आहेत. अनेक महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलून विविधक्षेत्रात काम करत आहेत. यांचा आदर्श घेऊन इतर इतर महिलांनी आपली वाटचाल सुरू ठेवावी. महिलांची आर्थिक स्थिती सदृढ करण्याचे काम या ठिकाणी केले जात असल्याचे सांगितले.
संघाचे मुख्य कार्यनिर्वाहक आर. टी. चौगुला यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. उत्तम पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी धनश्री पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते, संचालक आर. बी. पाटील, राजेंद्र ऐदमाळे, सुमित रोड्ड, प्रवीण पाटील, दर्शन पाटील, प्रदीप माळी, तैमूर मुजावर, आण्णासो बंकापूरे, राजू गजरे, अभय करोले, संदीप पाटील, काकासाहेब बेळंके, राकेश फिरगन्नवर यांच्यासह अरिहंत परिवाराचे पदाधिकारी, संचालक, पीकेपीएस व गारमेंटचे कर्मचारी उपस्थित होते. वैशाली महाजन यांनी आभार मानले.