सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा शाखेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास विषयक मार्गदर्शन करताना शाखेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रुपाली निलाखे (कासार) यांनी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना विद्यार्थ्यानी आहार कसा घ्यावा, योगा करावा, चांगल्या सवयी जोपासावेत व आपले आपल्या आई-वडिलांचे शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले. सौंदलगा …
Read More »केएलई एनएसएस छात्रांचे कुर्लीत विशेष शिबीर
सार्वजनिक स्वच्छता : विविध विषयावर मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : राणी चन्नम्मा विश्वविद्यालय, केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या वतीने 31 मे पासून 6 जून पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीराचे आयोजन कुर्ली येथे करण्यात आले होते. त्यानुसार दत्तक ग्राम विकास योजनेनुसार एनएसएसचे विद्यार्थ्यांनी गावात विविध उपक्रम राबविले आहेत. 31 रोजी …
Read More »श्रावणी भिवसेने स्केटिंगमध्ये केली धमाल
दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे सत्कार : 70 पेक्षा अधिक मिळविली पदके निपाणी (वार्ता) : जिद्द व चिकाटीच्या जोरावर श्रावणी भिवसे या विद्यार्थिनीने वयाच्या अवघ्या दहा वर्षांमध्ये स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये 70 हून अधिक पदके पटकावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकचे औचित्य साधून येथील दौलतराव सोशल फाऊंडेशन व जायंटस् ग्रुप ऑफ निपाणी …
Read More »कोगनोळी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साम संपन्न
कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे, हंचिनाळ येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रवींद्र देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »सौंदलगा येथे पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण
सौंदलगा : पर्यावरण दिनानिमित्त पतंजली योग समिती व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, वीरभद्र ऑरगॅनिक ॲन्ड सँडलवुड सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आमराई कृषी पर्यटन केंद्रावर चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा शितोळे यांनी सर्वांचे स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या दृष्टिकोनातूनच आम्ही आज चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण करणार आहोत. आजपर्यंत …
Read More »शिवरायांची तत्वे युवकांना प्रेरणादायी
बाबासाहेब खांबे : शिवसेनेतर्फे शिवराज्यभिषेक दिन निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या काळात सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन राज्य केले होते. त्यांच्या अनेक मार्गदर्शक तत्वांचा आजही वापर केला जात आहे. त्यामुळे हीच तत्वे आज युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख …
Read More »रोपे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार : ए. एच. मोतीवाला
पर्यावरण दिनी सत्कार निपाणी (वार्ता) : प्लास्टिकचा अतिवापर आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. परिणामी शुद्ध हवा मिळणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळजी गरज आहे. त्यामुळे येत्या काळात झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. …
Read More »प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक : डॉ. अच्युत माने
आंदोलन नगरात वृक्षारोपण : दौलतराव पाटील फाउंडेशनचा उपक्रम निपाणी : वातावरणातील बदल आणि प्लॅस्टिकचा वापर यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचा जीवसृष्टीवर आघात होत असून प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षारोपण हाती घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण …
Read More »माणकापूर येथे समाजकंटकाकडून शाळा इमारतीचे नुकसान
निपाणी : माणकापूर येथे समाजकंटकाकडून कन्नड शाळा इमारतीचे नुकसान करण्यात आले आहे. माणकापूर कन्नड शाळेत एका माथेफिरुने कन्नड शाळेच्या शैक्षणिक साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच सौचालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे आणि अश्या ज्ञानमंदिराचे जाणूनबुजून नुकसान करणाऱ्या माथेफिरूवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, …
Read More »जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्या दाम्पत्याला डंपरची धडक, पत्नी ठार, पती जखमी
चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta