Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी

काँग्रेस केपीसीसी सदस्यपदी निवडीबद्दल राजेश कदम यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांनी स्वागत तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माजी सभापती किरण कोकरे यांनी, कदम यांनी मिळालेल्या संधीचा …

Read More »

डॉ. आंबेडकराच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी नगरपंचायतीकडे जागा देण्याची निवेदनाद्वारे मागणी

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून ५ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या निधीतून सुसज्ज कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्याच्या समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनासह नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिका-यांना बहुजन समाजातर्फे देण्यात आले. विजयकुमार शिंगे यांनी, …

Read More »

भोजमध्ये साडेतीन एकर ऊसाला आग लावून ५ लाखाचे नुकसान

  ट्रान्सफार्मरमुळे लागली आग; हेस्कॉनसह पोलीस ठाण्यातर्फे पंचनामा निपाणी (वार्ता) : सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरू असून सकाळी दहा नंतर उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. अशातच भोज येथील ट्रान्सफार्मर मुळे सर्वे क्रमांक २७० मधील साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे दोनशे टन ऊसाचे नुकसान झाले …

Read More »

‘अरिहंत’ ऊस उत्पादकांचे हित जोपासले

  राजू खिचडे ; बोरगावमध्ये अभिनंदन, उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘अरिहंत’च्या माध्यमातून अभिनंदन आणि उत्तम पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना राबवून त्यांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात दिला आहे. यंदाच्या ऊस गळीत हंगामात जैनापुर मधील अरिहंत शुगर इंडस्ट्रीजतर्फे …

Read More »

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यपदी राजेश कदम यांची निवड

  पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची शिफारस : समर्थक, कार्यकर्त्यांचा जल्लोष निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीची ( केपीसीसी) रचना केली जात आहे. काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची या कमिटीत निवड केली जाते. त्यानुसार निपाणी भागामधून ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांची केपीसीसी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. …

Read More »

बोरगांव विविधोद्देशगळ प्राथमिक संघातर्फे अभिनंदन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

  निपाणी ‌(वार्ता) : बोरगांव येथील विविधोद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या संचालक मंडळातर्फे युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचा पाटील यांचा ५० व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.१४) अरिहंत मल्टीस्टेट संस्थेच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. अशोक माळी यांनी युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या …

Read More »

शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवतेज पाटीलला ब्रांझ पदक

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथीलशिवतेज भारत पाटील यांने ब्रांझ पदक पटकावले. गोडगिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सदरच्या राज्यस्तरीय स्पर्धा मारियामानहळ्ळी (जि. विजयनगर) येथे पार पडल्या. राज्यातून २३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मॅटवर पार पडलेल्या कुस्तीत ६० किलो वजनी गटात …

Read More »

महामार्ग सेवा रस्त्यावरील शिंदे नगरला बस थांबण्यासाठी आगारप्रमुखांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : येथील पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उपनगरातील प्रभाग क्र. २० शिंदे नगर परिसरात असणारा महामार्गानजीक सेवा रस्त्यावर बस थांबा आहे. बरेच चालक व वाहक या ठिकाणी बस थांबवत नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी निपाणी आगार प्रमुखांनी या ठिकाणी बस थांबवण्याच्या मागणीची …

Read More »

बेनाडी भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द क्रेडिट संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर बैठक होऊन सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र जनावडे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मधुकर जाधव यांनी स्वागत केले. नूतन अध्यक्ष रवींद्र जानेवाले यांचा सदाशिव जनवाडे व शंकर जनवाडे यांच्या हस्ते तर …

Read More »

जत्राटवेसमधील महात्मा बसवेश्वर सर्कलमध्ये कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी-चिक्कोडी रोडवरील जत्राटवेस मधील महात्मा बसवेश्वर सर्कलमध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे हा सर्कल शेकडो देव्यांनी उजळून गेला होता. येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामी आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी स्वामी व …

Read More »