इंडियन ग्रुपने पटकावले प्रथम क्रमांक निपाणी : आज रंगपंचमी निमित्त निपाणी जवळील अमलझरी गावात कुमार कंकणवाडे व सागर मोरे यांनी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं नियोजन केले होते. त्यामध्ये इंडियन ग्रुपनी प्रथम क्रमांक, बाल गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक तर एचटीएम बॉईजने तृतीय क्रमांक पटकावला. प्रस्ताविक व्यक्त करतांना कुमार कंकणवाडे म्हणाले, या क्रिकेट …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या. प्रारंभी कार्तिक पाटील याने स्वागत केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळातील अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून …
Read More »उन्हाळ्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली!
किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये नग : दरात दुप्पटीन वाढ निपाणी (वार्ता) : उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते, तसेच गारवा मिळतो. उन्हाच्या तडाख्यापासून काही वेळासाठी सुटका होते. लाल बुंद असणाऱ्या टरबुजाचे निपाणी बाजारात यंदादर वाढले असून ६० ते ७० रुपये नग …
Read More »ध्येय गाठण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज
बी. आर. यादव : कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : जीवनात अशक्य असे काहीही नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवले पाहिजे. कामाच्या योग्य नियोजनामुळे कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे. यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला पाहिजे. आज अनेक लोक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेवून यशस्वी झाले आहेत. गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी …
Read More »सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवारी
सौंदलगा : कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा रंगपंचमी दिवशी मंगळवारी (ता.२२) भरत असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा सोमवार (ता.२१) पासून सुरू होणार असून यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार …
Read More »राज्यस्तरीय पुरस्काराने नगरसेवक शौकत मणेर सन्मानित
निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब यांच्यावतीने येथील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता शौकत मणेर यांना पुरस्कार घोषित करण्यात आला होता. रविवारी नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शौकात मणेर यांनी पर्यावरण व जैविक विविधता संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत सदर पुरस्कार देऊन त्यांना …
Read More »रक्तदानाची समाजाला गरज!
निकु पाटील : दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत होता. मात्र सध्या हा संसर्ग कमी झाला असला तरीही अनेक रक्तदाते भीतीपोटी रक्तदानासाठी तयार नाहीत त्यामुळे अलीकडच्या काळात सर्वच रक्तपेढीमध्ये रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन दौलतराव पाटील …
Read More »बोरगावमध्ये वळीवाचा अनेक कुटुंबाना फटका!
घरांचे मोठे नुकसान : उत्तम पाटील यांच्याकडून तातडीने मदतीचा हात निपाणी : शनिवारी (ता. १९) बोरगाव आणि परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरावरील छत उडून गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले तर काही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती …
Read More »अरिहंतच्या ३.३२ लाखाच्या शिष्यवृत्तीचे वितरण
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : १०३ विद्यार्थ्यांना लाभ निपाणी (वार्ता) : अरिहंत सौहार्द संस्थेच्या सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून अरिहंत शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी सुमारे शंभर ते दीडशेहून अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यावर्षी दहावी व बारावी परीक्षेत …
Read More »‘अंकुरम’च्या विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची होळी!
अनोख्या उपक्रमाचे कौतुक : विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन निपाणी : येथील श्रीनगरमधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांनी ‘चला करुया दुर्गुणांची होळी’ हा अनोखा उपक्रम शाळेत राबवल्याने दुर्गुणांची होळी पेटली. या जळत्या होळीत विद्यार्थ्याना न आवडणारी, स्वत:मध्ये असलेल्या दुर्गुणांना एका चिठ्ठीवर लिहुन होळीत टाकली. प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta