Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी

आसन व्यवस्थेअभावी, महाराष्ट्रातील प्रवासी प्लॅटफॉर्मवर

  प्रवाशातून संताप ; निपाणी आगार दुजाभाव करत असल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र आणि कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून निपाणी आगाराची ओळख आहे. पण त्या ठिकाणी कर्नाटकासह महाराष्ट्रातील प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था असल्याने बसची वाट पहात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागते. महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना आसन व्यवस्थाच नसल्याने त्यांना …

Read More »

स्वावलंबनामुळे उद्योजकतेला चालना मिळेल : डॉ. बी. जी. पाटील

  बागेवाडी; महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील परिषद निपाणी (वार्ता) : विकसित भारत हा केवळ आर्थिक वाढीचा घटक नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचा एक व्यापक प्रकार आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. उत्पादन क्षेत्र, शेती, सेवा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासासह २०४७ पर्यंत शक्तिशाली देश बनू शकतो. …

Read More »

सिदनाळ बंधाऱ्यासह नदी काठावर मगरीच्या वावराने नागरिकातून भिती

  निपाणी (वार्ता) : सिदनाळ (ता. निपाणी) येथील वेदगंगा नदीकाठासह बंधारा परिसरात मगरीचा वावर वाढल्याने प्रवास करणाऱ्यासह शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मगरीचा वन खात्याने तात्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी नागरीकातून होत आहे. वेदगंगा नदीवर अकोळ -सिदनाळ रस्त्यावर असलेल्या सिदनाळ बंधाऱ्यावर रात्री मगर फिरत …

Read More »

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध

  खासदार प्रियांका जारकीहोळी; कुर्लीत पाया खोदाई समारंभ निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी काँगेसतर्फे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पिण्याचे पाणी, भवन, शाळा खोल्या सभामंडप अशा कामांना चालना देत आहोत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. कुर्ली येथे खासदार …

Read More »

इंदिरा किटव्दारे लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; बोरगाव संघामध्ये धान्य वितरणाचा प्रारंभ निपाणी (वार्ता)सर्वसामान्य कुटुंबीयांना शुद्ध आणि सात्विक अन्न मिळावे,या उद्देशाने राज्यातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने अन्नभाग्य योजना प्रभावीपणे राबवली आहे. पंचहमी योजनमुळे अनेकांचे जीवन सुखकार झाले आहे. आता लवकरच इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे वितरण लाभाथ्यर्थ्यांना सरकार करणार असल्याचे बुडा अध्यक्ष लक्ष्मण …

Read More »

तंत्रज्ञानाच्या युगात तरुण शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची

  प्रा. डॉ. गजानन राशिंगकर; बागेवाडी महाविद्यालयात विज्ञान चर्चासत्र निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आले आहे. पण त्याचा वापर करण्याची आपली जबाबदारीही वाढली आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यातून तरुण शास्त्रज्ञांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रायोगिक …

Read More »

परिस्थितीनुसार कविता जन्म घेते

  प्रा. डॉ. अच्युत माने; ‘भूतकाळ’ काव्य संग्रहाचे निपाणीत प्रकाशन निपाणी (वार्ता) : कवी हा जन्मताच कवी नसतो तो परिस्थितीनुसार निर्माण होतो. समाजातील चांगल्या वाईट घटनेवर आपल्या आयुष्यातील सुखदुःखातील घटनेवर कवी कविता लिहित असतो. कविता ही प्रकट व्हावी लागते. ती जन्मावी लागते, असे मत प्रा. डॉ.अच्युत माने यांनी व्यक्त केले. …

Read More »

बेनाडीतील झेंडूची फुले निघाली गोव्याला

  चार एकरात घेतली झेंडूची बाग : संदीप तावदारे यांनी फुलवली फुलशेती निपाणी (वार्ता) : निसर्गाचा लहरीपणा, शेती पिकवण्यासाठी येणारा खर्च, शेतीमालाला मिळणारा दर अशा विविध कोंडीत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यावर मात करून बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप तावदारे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देऊन चार एकर क्षेत्रात झेंडूची बाग …

Read More »

‘पंचहमी’ योजनेच्या यशस्वीतेसाठी गळतगा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक

  निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य सरकारने पंच हमी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ अनेक सामान्य कुटुंबियांना होत आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी गळतगा येथे पंचमी योजना कमिटी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या योजनेचा सर्वच गरीब कुटुंबांना लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी …

Read More »

वस्त्रोद्योग पार्कमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे ; बोरगाव मधील बैठकीत मागणी निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमा भागातील वस्त्रोद्योगाला चालना मिळावी. होतकरू व्यवसायिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राज्य वस्त्रोद्योग खात्यातर्फे बोरगाव येथे ७५ एकरमध्ये वस्त्रोद्योग पार्क निर्माण केले आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून बोगस कागदपत्रे दाखवून सबसिडी लाटली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात …

Read More »