Sunday , July 26 2026
Breaking News

सिदनाळ बंधाऱ्यासह नदी काठावर मगरीच्या वावराने नागरिकातून भिती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सिदनाळ (ता. निपाणी) येथील वेदगंगा नदीकाठासह बंधारा परिसरात मगरीचा वावर वाढल्याने प्रवास करणाऱ्यासह शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मगरीचा वन खात्याने तात्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
वेदगंगा नदीवर अकोळ -सिदनाळ रस्त्यावर असलेल्या सिदनाळ बंधाऱ्यावर रात्री मगर फिरत असल्यांची रात्री प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना आढळून आली. बंधाऱ्यावरून सिदनाळ, हुन्नरगी, भोजवाडी भागातील नागरीक रात्रीचा प्रवास करीत असतात. याशिवाय परिसरात अनेक शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेच्या विद्युत मोटारीही आहेत. या भागातील शेतकरी रात्री -अपरात्री या नदी परिसरात ये-जा करतात. रात्री मगर बंधाऱ्यावर आलेली दिसल्याने या भागातील नागरीकात भिती निर्माण झाली आहे. या मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *