Monday , September 21 2026
Breaking News

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध

Spread the love

 

खासदार प्रियांका जारकीहोळी; कुर्लीत पाया खोदाई समारंभ

निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी काँगेसतर्फे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पिण्याचे पाणी, भवन, शाळा खोल्या सभामंडप अशा कामांना चालना देत आहोत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. कुर्ली येथे खासदार फंडातून दहा लाख रुपये निधी मंजूर झालेल्या श्री दत्त सेवा संस्थेच्या मंदिराच्या समोरील
सभामंडपाच्या कामाच्या पाया खुदाई प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष व लक्ष्मण चिंगळे होते.
माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार माळी यांनी, कुर्ली येथील श्री दत्त मंदीर २३ लाख खर्चून पुर्ण झाले आहे. मंदिराचा लोकवर्गणी, देणगीदार, धर्मस्थळ निधी, आमदार शशिकला जोल्ले यांच्या आमदार फंडातून केलि आहे.
मंदिराच्या दर्शनी भागात सभामंडप बांधण्यासाठी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी खासदार फंडातून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील, सुजय पाटील यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सिद्धगोंडा शेडबाळे, दिलीप दिवटे, कुमार माळी, एस. बी. चौगुले, धीरज पाटील, प्रकाश डोंगरे, यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. दत्त सेवा संस्थि, कुरली व भाटनांगनुर काँग्रेस कमिटीतर्फे प्रियांका जारकिहोळी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. येथील राजगिरी राजगिरी महाराज यांचे समाधी स्थान असलेल्या यांच्या मठाला भेट देण्यात आली. यावेळी संदीप पोवार, धोंडीराम माळी, बाबुराव माळी, दशरथ कुंभार, आप्पा लोकरे, सदाशिव उपरे, महादेव आबने, नंदकुमार खोत, बाळू कांबळे, काका डोंगरे, दादासो ढगे, रामदास जाखले, व कुरली येथील असंख्य ग्रामस्थ व महिला मंदिरामध्ये उपस्थित होते. एस. बी. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *