Monday , September 21 2026
Breaking News

कपिलेश्वर तलावात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर परिसरातील नव्या तलावात दुपारी सुमारे चारच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून चौकशीला सुरुवात केली.

माहितीनुसार, तलावाच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ याची माहिती संबंधितांना दिली. समाजसेवक अवधूत तुडवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

घटनेची वार्ता समजताच तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती. संबंधित मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा शोध खडे बाजार पोलीस घेत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *