१५० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती; रहदारी पोलिसही कार्यरत निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेबांचा दर्गा उरूस २६ ते २८ अखेर साजरा होत आहे. गुरुवारपासून उरूसाला प्रारंभ झाला शुक्रवारी (ता.२७) मुख्य दिवस असून, उरूसासाठी जादाची पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. १५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. बसस्थानक परिसर व आवश्यक …
Read More »यरनाळ ग्रामस्थांची ३०० वर्षापासून उरुसासाठी भाकरीच्या पिठाची परंपरा
निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दस्तगीर साहेब दर्ग्यामध्ये भक्त परंपरा गेल्या ३०० वर्षापासून अबाधित आहे. निपाणीपासून जवळच असलेल्या यरनाळ ग्रामस्थांनाही संत बाबामहाराज यांच्या चमत्काराची अनुभूती आली आहे. त्यामुळेच यरनाळ ग्रामस्थांच्या वतीने गेल्या ३०० वर्षांपासून भाकरीचे पीठ प्रत्येक वर्षी ऊरूसासाठी आणून देत आहेत. यंदाही मानाच्या भाकरीचे …
Read More »दुर्गामाता दौडीमुळे पराक्रमांची ओळख
आशिष भाट; निपाणीत दौडीची सांगता निपाणी (वार्ता) : दुर्गा माता दौडीतून सध्याच्या तरुण पिढीला एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. दौडीच्या काळात तरुण पिढीवर धर्मसंस्कार करण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची ओळख झाली आहे. यापुढील काळात युवकांनी अशा थोर व्यक्तींचे विचार डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी काम करावे, असे …
Read More »निपाणीतील उरूसाला उद्यापासून प्रारंभ
शुक्रवारी भर उरुस ; हजारो भाविक दाखल निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांचा उरूस गुरुवारी (ता.२६) ते शनिवार (ता.२८) अखेर साजरा होणार आहे. उरूसानिमित्त चव्हाण घराण्याकडून दर्ग्यात चुना चढविण्याचा विधी पार पाडून ऊरूसाला गुरुवार (ता.२६) …
Read More »निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमीपूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : निपाणीसह परिसरात मंगळवारी (ता. २४) विजयादशमी पारंपरिक पद्धतीने झाली. त्यानिमित्त शमीपूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. येथे सायंकाळी ६ वाजता सासणे कुटुंबीयातर्फे महादेवाची तर निपाणकर राजवाड्यातून सिद्धोजीराजेंची पालखी बेळगाव नाका येथील आमराई रेणुका मंदिरात आणली. तेथून चव्हाणमळा येथे श्रीमंत …
Read More »हेस्कॉम आंदोलनाबाबत रायबाग येथे जागृती
निपाणी (वार्ता) : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्यावी तसेच हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळाल्याच्या घटना जिल्ह्यात अनेक ठिकाणी घडल्या. याचा पंचनामा होऊनदेखील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता.२७) हुबळी येथील हेस्कॉमच्या मुख्य कार्यालयावर रयत संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात रायबाग …
Read More »इतर कारखान्याप्रमाणेच ‘अरिहंत’ दर देणार
युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत शुगर्सचा सहावा गळीत हंगाम प्रारंभ निपाणी (वार्ता) : जैनापुर (ता. चिक्कोडी) येथील अरिहंत शुगरचा यंदाच्या वर्षातील गळीत हंगामाचा चार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून या भागातील इतर कारखान्याबरोबर शेतकऱ्यांना दर देणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. ते कारखान्याच्या …
Read More »ऊरूस उत्सव शांततेत पार पाडा
मंडळ पोलीस निरीक्षक तळवार; निपाणी शांतता बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचा ऊरुस गुरुवारपासून (ता.२६) सुरू होत आहे. हा ऊरूस उत्सव शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी केले. उरुसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता …
Read More »द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे नोंदवा
निपाणीत हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन …
Read More »बेळगाव, रेंदाळ संघ नितीन शिंदे चषकाचे मानकरी
‘धनलक्ष्मी’तर्फे क्रिकेट स्पर्धा, ४६ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या सहकार्याने धनलक्ष्मी संस्थेतर्फे नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ येथील म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर नितीन शिंदे चषक-२०२३, ग्रामीण व शहरी क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये शहरी विभागात बेळगाव येथील के. आर. शेट्टी तर ग्रामीण विभागात रेंदाळ स्पोर्ट्स क्लबने …
Read More »