Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

गणेश मंडळाला दिली ५० रोपांची देणगी

  शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम; कुरलीतील मंडळांनी लावली रोपे निपाणी (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात अनेक मंडळाकडून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात आकर्षक विद्युत रोषणाई, महाप्रसाद वाटपासह डॉल्बी, डीजे लावून लाख रुपये खर्च केले जातात. ही बाब गांभीर्याने घेऊन निपाणी येथील पर्यावर प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले …

Read More »

हालसिद्धनाथने नफा – तोट्याची सत्य माहिती न दिल्यास आंदोलन

  ‘रयत’चे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार ; पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याचा नफा व तोट्याची सत्य माहिती सभेत याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाला दिले आहे. माहिती न दिल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन …

Read More »

खानापूरवासीयांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार : मंत्री दिनेश गुंडूराव

  खानापूर येथील एमसीएच हॉस्पिटलचे उद्घाटन आणि १०० खाटांच्या सार्वजनिक इस्पितळाचे भूमिपूजन खानापूर : तालुक्यातील जनतेला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 60 खाटांचे माता-शिशु रुग्णालय बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 100 खाटांचे तालुका रुग्णालयही लवकरात लवकर बांधण्यात येईल, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, …

Read More »

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात झालेल्या विविध घोटाळ्यांबाबत सरकार आणि तपास यंत्रणांच्या चौकशीच्या संदर्भात करावयाच्या कारवाईचा आढावा आणि समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची बैठक आठवड्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या याचिकेवर आज पुढील सुनावणी

  अंतिम निकालाचीही शक्यता बंगळूर : राज्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याबाबत आज (ता. १२) उच्च न्यायालयात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. उद्या ते शक्य नसल्यास, उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती नागप्रसन्ना अंतिम निकाल देऊ शकतात किंवा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर निकाल राखून ठेवू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचे …

Read More »

…चक्क कन्नडमध्ये औषधांचे प्रिस्क्रिप्शन!

  बंगळुरू : एखाद्या भाषेच्या अस्तित्वाला किंवा नष्ट होण्यास आपणच जबाबदार आहोत. एखाद्या भाषेचे कौतुक, आदर, वापर यामुळे ती भाषा टिकते. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे भाषेबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. त्याचप्रमाणे येथील एका डॉक्टरने आपल्या मातृभाषेवर, कन्नडच्या प्रेमापोटी आता आपल्या कन्नडमध्ये औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली आहे. याद्वारे कन्नड प्रेम वेगवेगळ्या प्रकारे …

Read More »

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून लक्ष्मी देवीच्या सोन्याच्या 16 पुतळ्या, तसेच 40 ते 50 तोळा चांदीचे दागिने, कमरपट्टा व इतर, सोन्या चांदीचा किमती ऐवज चोरीला गेला आहे. त्याची किंमत अडीच लाखापर्यंत आहे. आज सकाळी पुजाऱ्याच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आली. खानापूर पोलीस स्थानकाला …

Read More »

लिंगायत आरक्षणासाठी २२ रोजी अधिवेशन

  बसव मृत्युंजय स्वामी; वकील संघटना करणार नेतृत्व निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला २/अ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे, यासाठी पाच वर्षापासून लढा सुरू आहे. तरीही शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. परिणामी राज्यातील लिंगायत समाजातील वकील संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे निश्चित केले आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी …

Read More »

समाज एकसंघ ठेवण्यासाठी सण उत्सवांची रचना

  कमल चौगुले‌; कुर्लीत झिम्मा, फुगडी स्पर्धा निपाणी (वार्ता) : आजच्या धावत्या युगात भारतीय संस्कृतीचा वारसा सणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे शक्य आहे.भारतीय सण उत्सवांची रचना ही सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी केली आहे, असे मत निलगंगा महिला मंच अध्यक्षा कमल चौगुले यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथील एच जे सी …

Read More »

कर्नाटकचे आरोग्यमंत्री सन्माननीय दिनेश गुंडूराव जिजाऊ मंडळाच्या गणरायाच्या चरणी…

  खानापूर : आज कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, शिवस्मारक चौकातील जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या दर्शनास पोचले.. डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आरोग्यमंत्र्यांना आमच्या गणपती मंडळास भेट देण्याची विनंती केली असता मा. मंत्री महोदयांनी लगेच होकार दर्शविला. आरोग्य मंत्र्याच्या हस्ते गणरायाची आजची आरती संपन्न झाली. जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सन्माननीय दिनेश गुंडूराव …

Read More »