Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

नगरपालिका आवार की भंगार वाहनांचा डेपो?

  नगरपालिकेची अनेक भंगार वाहने धुळखात; इंधनावर महिन्याला लाखोंचा खर्च निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील स्वच्छतेचा भार नगरपालिकेवर आहे. यासाठी पालिकेकडे एकूण ३२ घंटागाड्या आहेत. मात्र या घंटागाड्या अपुऱ्या असल्याचे नवीन घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे, स्वतः पालिकेचाच अक्कोळ क्रॉसवरीर परिसर अस्वच्छ झाला आहे. मागील वर्षभरापेक्षा काळापासून …

Read More »

ऊसावर केवडा, लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे निपाणी भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंता

  निपाणी (वार्ता) : यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांनी उस लागवडीकडे कल वाढवला आहे. मात्र ऊस पिकावर अचानक केवडा रोगासह नोकरी माव्याचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उसाची पाने पिवळी पडण्यासह वाढ खुंटत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला …

Read More »

बॅटरी स्वस्त, मोबाईल महाग!

  इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या किमती वाढल्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : केंद्रीय अर्थसंकल्पात लिथियम बॅटरीचे दर कमी होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर सामान्य नागरिकांना स्मार्टफोन स्वस्त होण्याची आशा लागली होती. मात्र इतर आवश्यक इलेक्ट्रॉनिक साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्यांसाठी मोबाईलच्या किमती महागच असल्याचे येथील स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. असाच निर्णय काही महिन्यांपूर्वी दिवाळीच्या सुमारास …

Read More »

तणावमुक्त वातावरणात परीक्षा दिल्यास हमखास यश

  गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक; दहावी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र निपाणी (वार्ता) : दहावीच्या परीक्षांना केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या वेळापत्रकासह इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती, तणाव आणि दडपणाची भावना निर्माण होते. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर स्वतःच्या …

Read More »

बोरगावमधील तलवार मळ्यात म्हसोबा यात्रा

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील तळवार मळ्यातील श्री म्हसोबा देवाची यात्रा पार पडली. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त सकाळी म्हसोबा मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले. यावेळी म्हसोबा मंदिर कमिटीतर्फे त्यांचा सत्कार …

Read More »

कुन्नुरमधील पाणी योजना बंद करण्याचा घाट

  प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध ग्रामस्थांचा यल्गार : योजना बंद केल्यास उपोषणाचा इशारा निपाणी (वार्ता) : कुन्नुर (ता.निपाणी) येथील सध्या अस्तित्वात असलेल्या आणि गावाला पिण्याचा मुबलक पाणीपुरवठा करणारी योजना बंद करण्याचा घाट प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे त्याला ग्रामस्थांनी विरोध केला असून बहु ग्राम पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार? त्याचे पाणी ग्रामस्थांना …

Read More »

बोरगाव येथील पी. एम. श्री. मराठी शाळेत ‘अभ्यास जत्रा ‘उपक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पी.एम. श्री. सरकारी मराठी प्राथमिक शाळेत बोरगाव सी. आर. सी. पातळीवरील ‘अभ्यास जत्रा’ उपक्रम पार पडला.बोरगाव सी.आर.सी. प्रमुख राजू कोकणे, मुख्याध्यापक आर. एम. पकाले शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष. शिवाजी भोरे, उपाध्यक्षा स्वाती शिंगेव मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलाने कार्यक्रमाचे उद‌घाटन झाले. राजू कोकणे यांनी, म्हणाले, अभ्यास …

Read More »

विधानसौध येथील मंत्र्यांच्या कार्यालयातून सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला

  बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे पॉवरहाऊस आणि उच्च सुरक्षा असलेले ठिकाण असलेल्या विधान सौध येथून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या विधान सौध येथील कार्यालयातून ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १.५० लाख रुपये रोख असलेली बॅग चोरीला गेली. चोरी प्रकरणी विधान सौध पोलिसांनी …

Read More »

खानापूर : समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड

  खानापूर : खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. नाडगौडा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कर्नाटक गव्हर्नमेंट रिकनाईज्ड नेटबॉल असोसिएशन, दावणगिरी यांच्या वतीने आयोजित अंडर 19 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी …

Read More »

ढोकळा, पाणीपुरी, भेळ, लस्सी, शिरा, उपमासह बरेच काही

  मराठा मंडळमध्ये रंगला खाद्य महोत्सव ; ६० विद्यार्थिनींनी घेतला सहभाग निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित, बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि मराठा मंडळ हायस्कूलया संयुक्त विद्यमाने मराठा मंडळाच्या पटांगणात खाद्य महोत्सव रंगला. त्यामध्ये तब्बल ६० विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन ढोकळा, पाणीपुरी, भेळ, सँडविच, लस्सी, कटलेट, शिरा, उपमा, …

Read More »