Monday , May 25 2026
Breaking News

अजित पवार विमान अपघात प्रकरणी कर्नाटकात ‘झीरो एफआयआर’ दाखल

Spread the love

 

बेंगळुरू : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी ‘झीरो एफआयआर’ दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. हा केवळ अपघात नसून एक “मोठा गुन्हेगारी कट” असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्यामुळे, रोहित पवारांनी बंगळुरू पोलिसांकडे ही तक्रार नोंदवली, जी आता तपासासाठी बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी 23 मार्चला कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने एफआयआर दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या एफआयआरचा तपास कशा पद्धतीने होतो, याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू, असे रोहित पवार म्हणाले.

कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या झीरो एफआयआरमध्ये काय?

कर्नाटकातील बेंगळुरू येथे नोंदवण्यात आलेल्या ‘झीरो एफआयआर’ मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत. ही तक्रार त्यांच्या पुतण्याने रोहित पवार यांनी दाखल केली असून, या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तक्रारीत विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले असून, उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आली होती, असा आरोप आहे. याशिवाय विमानाच्या वापराच्या तासांमध्ये विसंगती (अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यात फरक), पायलटची शेवटच्या क्षणी केलेली बदल, तसेच संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व बाबींमुळे अपघात हा केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेली घटना असू शकते, म्हणून सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी या झीरो एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील चारसह राज्यसभेच्या २४ जागांसाठी १८ जूनला निवडणुक

Spread the love  बंगळूर : भारतीय निवडणुक आयोगाने १० राज्यांतील २४ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *