Monday , May 25 2026
Breaking News

मराठा बँक नोकर भरती प्रकरण : कृतीशील मराठा समाजाच्या बैठकीत बँकेच्या कारभारावर ताशेरे

Spread the love

 

 

बेळगाव : मराठा बँकेची नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक आणि मराठा समाजाच्या युवकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी कृतीशील मराठा समाजाचे समन्वय अमित देसाई यांनी केली. कृतीशील समाजाच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.

कृतीशील मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक दिनांक 24 रोजी जत्तीमठ येथे पार पडली.

यावेळी बोलताना अमित देसाई ते म्हणाले की, बेळगाव शहरात मराठा समाजाच्या अनेक संस्था कार्यरत आहेत. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहावे. सध्या शहरातील मराठा बँकेत नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे. मराठा बँकेत 22 पदे रिक्त असून यासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये आणि मराठी भाषिक तसेच मराठा समाजाच्या युवक-युवतींना नोकरीसाठी संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे यासाठी आपण बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून प्रश्न उपस्थित केले होते. परंतु आपल्याला याबाबत अद्याप लेखी उत्तर देण्यात आलेले नाही. बेळगाव शहर आणि परिसरातील मराठा समाजाच्या युवकांनी मराठा बँकेत नोकरीसाठी अर्ज करताना अर्ज व्यवस्थित भरण्यात यावा याबाबत कोणतीही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा तसेच नोकरीच्या आमिषाने कोणालाही पैसे देऊ नये. मराठा बँक मराठा समाजाची संस्था आहे ती व्यवस्थित चालावी तसेच समाजाच्या गुणवत्ताधारक युवकांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कृतीशील मराठा समाजातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. नोकर भरती दरम्यान कोणताही भ्रष्टाचार झाल्यास शांत बसणार नाही असा इशारा देखील अमित देसाई यांनी यावेळी दिला.

बैठकीदरम्यान, बँकेच्या माजी संचालिका नीना काकतकर, नारायण अष्टेकर, दत्ता जाधव, गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी चंद्रकांत कोंडुस्कर, विक्रम पाटील, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, किरण हुद्दार, शेखर पाटील, मोतेश बारदेशकर, नारायण सांगावकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे दि. 27 रोजी राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान

Spread the love  बेळगांव : श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास आणि बाल विकास केंद्र, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *