Sunday , July 26 2026
Breaking News

हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर सिलेंडर द्या

Spread the love

 

शहरातील हॉटेल संघटनेची मागणी; तहसीलदार कार्यालयाला दिले निवेदन

निपाणी (वार्ता) : युद्धजन्य परिस्थितीमुळे आठवड्यापासून हॉटेल व्यवसायिकांना व्यवसायिक सिलेंडर देणे बंद केले आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून अनेक जणांनी हॉटेल बंद केले आहेत. त्याचा अनेक कुटुंबीयांवर परिणाम होत असून हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी येथील हॉटेल व्यवसायिकांनी बुधवारी (ता.२५) तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले.

निवेदनातील माहिती अशी, व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यामध्ये होत असलेल्या अनियमिततेमुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. वेळेवर गॅस उपलब्ध न झाल्यामुळे रोजच्या कामकाजात अडथळे येत आहेत. शिवाय ग्राहकांची गैरसोय होण्यासह व्यावसायिकांची प्रतिमा देखील खराब होत आहे. काही ठिकाणी तर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याशिवाय आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. गॅस पुरवठ्याची अशीच परिस्थिती राहिल्यास हॉटेल व्यवसाय उध्वस्त होणार आहे. त्यामुळे व्यवसायावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे उघड्यावर पडणार आहेत. तरी प्रशासनाने हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर व्यवसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
उप तहसीलदार मृत्युंजय डंगी यांनी निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी दीपक इंगवले, मधुकर खवरे, अरुण खडके, राहुल भाटले, बाळासाहेब जासूद, हर्षा शेट्टी, सुनील सांगावकर, नरेंद्र येजरे, सुहास दुधाने, पिंटू बोधले, किशोर सांगावकर, प्रसाद बोरगावे, रोहन राऊत यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *