Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी नगरपालिकेत १२ व्या शतकातील देवर दासीमय्यरवर यांची जयंती साजरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात नगरपालिकेतर्फे १२ व्या शतकातील महान काव्यरचनाकार, राज्यातील महान संत देवर दासीमरय्यवर यांची जयंती साजरी करण्यात आली टाऊन प्लँनिग अध्यक्ष संयोजीत ऊर्फ निकु पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र शिंदे यांचे हस्ते प्रतिमा पुजन झाले.
नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी, १३ व्या शतकात कर्नाटक राज्यात होऊन गेलेले महान संत देवर दासीमरय्यरवर यांच्या कार्याबद्दल माहीती दिली. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, सुप्रीया पाटील, तात्यासाहेब नाईक, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, मराठा बँकेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अरुण आवळेकर, प्रतीक शहा, दिपक वळीवडे, रवी श्रीखंडे, किरण पाटोळे, सुखदेव मगदूम, झाकीर कादरी, विनोद बल्लारी यांच्यासह नगरपालीकेचे कर्मचारी व नागरीक उपस्थीत होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *