मांड्या : कर्नाटकातल्या मांड्या जिल्ह्यातल्या केरागोडू गावात हनुमान ध्वज उतरवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. १०८ फूट उंच स्तंभावरुन हनुमान ध्वज हटवण्यात आल्याने वाद पेटला आहे. या वादाने राजकीय वळण घेतलं आहे. भाजपा नेते, कार्यकर्ते विरुद्ध कर्नाटक सरकार असा वाद पेटला आहे. त्यामुळे या गावात कलम १४४ लागू करण्यात आलं …
Read More »शालेय बस आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांचा मृत्यू
बागलकोट : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील आळगुरु गावात शालेय वाहन आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, आळगुरु गावातील श्री वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …
Read More »सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे हळदी -कुंकू
निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील न्यू हुडको कॉलनीमधील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे हार्दिक कुंकू कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगरसेविका उपासना गारवे तर प्रमुख पाहुण्या म्हणून बोरगाव येथील विनय श्री अभिनंदन पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मानेवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा …
Read More »मराठा आरक्षणामुळे मत्तीवडेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : मनोज जरांगे यांनी आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे. यासाठी गेली तीन महिने झाले उपोषण करून महाराष्ट्र सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसले नाहीत. त्याचा आनंद उत्सव मत्तीवडे गावामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी अध्यक्ष बंडा पाटील यांच्या हस्ते …
Read More »विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील
लक्ष्मीकांत पाटील; कुर्ली हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी सामाजिक संस्थांनी सामाजिक भूमिकेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून जबादार पालकाची भूमिका पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले …
Read More »निपाणी गोरक्षण समितीच्या पुढाकाराने १२ टन गोमांस जप्त
निपाणी (वार्ता) : येथील विरूपाक्षलिंग समाधी मठाच्याप्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकडे जाणाऱ्या गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी वाहतूक करणारा वाहनासह संशयित आरोपी आणि १२ टन गोमांस पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हैदराबादकडे एका वाहनातून (एम.एच.१० टी-२६७६) गोमांस जात असल्याची माहिती निपाणी …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रभारी आणि समन्वयकांची नियुक्ती
बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्याच्या प्रभारी आणि समन्वयकांची नियुक्ती केली आहे. कर्नाटक राज्याचे प्रभारी डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांची तर सुधाकर रेड्डी यांची राज्य सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील २८ मतदारसंघांच्या प्रभारी आणि समन्वयकांची यादी पुढीलप्रमाणे : १) म्हैसूर – डॉ. अश्वथ नारायण – प्रभारी, …
Read More »खते, कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावला
डॉ. शंकर पाटील; ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यानंतर शासनाने हाती घेतलेल्या हरितक्रांती कार्यक्रमामुळे शेतीतील उत्पादन वाढले. पण परराष्ट्रीय कंपन्यांनी रासायनिक खते व बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, म्हणून प्रचार, प्रसार केला. साहजिकच शेतकऱ्यांनी वाढीव उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अमाप वापर केला. संकरित बियाण्यांमुळे शेतक-यांचे पारंपारिक …
Read More »मराठा आरक्षणामुळे निपाणीत आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात शांततेने अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा सपाटा लावला होता. त्यामुळे मोर्चे, आंदोलन आणि उपोषणामुळे महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली. अखेर शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे निपाणी भाग मराठा समाजातर्फे येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात पेढे वाटून …
Read More »लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी : बी. वाय. विजयेंद्र माहिती
बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी तयारी करावी. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta