निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी निपाणी येथे मंगळवारी (ता.३०) सायंकाळी भेट दिली. यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी त्यांचे बस स्थानक सर्कल मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की’, जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी बस स्थानक परिसर दणाणून गेला.
युवा उद्योजक साळुंखे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली.
यावेळी विष्णू कडाकणे, झुंजार दबडे, विनोद चोरगे, दीपक सांगावकर, विजय साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील, रुपेश वाडकर, नितीन हजारे, अजित पाटील, धीरज शिंगे, साई यादव, सुमित जाधव, सचिन पावले, अनिकेत विटेकरी, संतोष घोरपडे, प्रमोद जाधव, निलेश पावले, रतन जाधव, उत्तम कापसे, प्रदीप सातवेकर यांच्यासह मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.