Saturday , June 13 2026
Breaking News

नाईलाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल

Spread the love

 

खानापूर : गुरुवार दिनांक 2 मे 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे हे कारवार लोकसभा भाजपाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ खानापूर मध्ये येत आहेत असे आम्हाला समजले. त्या संदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आपणाला विनंती करू इच्छितो की, या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात उपस्थित राहून जर सभा घेतली तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात आपण आहात हे सिद्ध होईल त्यासाठी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी आपणाला विनंती करतो की आपण सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करू नये जर आपण खानापुरात उपस्थित राहून प्रचार सभा घेतली तर नाईलाज आम्ही आपणाला काळे झेंडे दाखवून आपला निषेध केला जाईल ही आपण दक्षता घ्यावी म्हणून आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आपणाला विनंती करतो.

About Belgaum Varta

Check Also

शेतातून घरी परतताना तरुणावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती स्थिर

Spread the love  कणकुंबी : तालुक्यातील कणकुंबी वनक्षेत्रातील हुळंद गावाबाहेर बुधवारी संध्याकाळी शेतकाम आटोपून घरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *