Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

शिकारीपूरमध्ये येडियुरप्पांच्या घरावर दगडफेक; संचारबंदी

  आरक्षणाविरोधात बंजारा समाजाचे आंदोलन बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुर येथील भाजप जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या घरावर बंजारा समाजाच्या सदस्यांनी सोमवारी दगडफेक केली. राज्य सरकारच्या अनुसूचित समुदायांसाठी (एससी) अंतर्गत आरक्षणाच्या घोषणेला विरोध झाल्याने शहरात निषेधाज्ञा (कलम १४४) लागू करण्यात आला आहे. या आंदोलनात काही पोलीस …

Read More »

कर्नाटकातील भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा लाचप्रकरणी अटकेत

  बंगळुरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना सोमवारी (दि. २७ मार्च) तुमाकुरू येथील क्याथासांद्र टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली. भाजपचे आमदार मादल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदाल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी २ …

Read More »

विरुपक्षालिंग समाधी मठ गोशाळेच्या चाऱ्याला आग लावणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी

  निपाणी : अज्ञात समाजकंटकाकडून श्री विरुपक्षालिंग समाधी मठ गोशाळेच्या चाऱ्याला आग लावण्यात आली. अशा समाजकंटकाला शोधून कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने बसवेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय आनंदराज कॅरीकट्टी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निपाणी तालुक्यामधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कायदेशीर …

Read More »

जिल्हाधिकारी दानम्मनवर व जिल्हा पोलिस प्रमुख आनंद कुमार यांची अचानक चेकपोस्टला भेट

  विजयपूर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजयमहंतेश बी. दानम्मनवर आणि जिल्हा पोलिस प्रमुख एच. डी. आनंद कुमार यांनी रात्री उशिरा अचानक भेट देऊन चेकपोस्टच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली. जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कानमडी, अलगीनाळा यासह विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टला भेट देऊन त्यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहिता …

Read More »

जितो इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” पुरस्कार प्रमोद कोचेरी यांना प्रदान

  खानापूर : खानापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागातील रस्ते होण्यासाठी, दुर्गम भागातील गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क ठेवून त्यांच्या कानावर या गोष्टी घालून लोकांच्या समस्या मार्गी लावणारे व या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांना जितो इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” …

Read More »

हैदराबाद मुक्तीसाठी लढणाऱ्यांचा काँग्रेसला विसर

  अमित शहा यांचा हल्लाबोल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण बंगळूर : ज्यांनी हैदराबादच्या ‘क्रूर’ निजाम राजवटीपासून मुक्ती मिळविण्यासाठी लढा दिला आणि बलिदान दिले त्यांची काँग्रेसला कधीही आठवण झाली नाही, असा आरोप करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बिदर जिल्ह्यातील गोरटा गावात गोरटा हुतात्मा …

Read More »

आमदार सुनील गौडा पाटील यांनी हृदयविकाराने त्रस्त तरुणावर केला मोफत उपचार

  विजयपूर : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका गरीब बांधकाम कामगाराला शस्त्रक्रियेसाठी मदत करून विधान परिषद सदस्य सुनील गौडा पाटील यांनी माणुसकी दाखविली. विजयपूर शहरातील इंडी रोड येथील हमनमंता गोठे (वय 28) यांना हृदयविकाराचा आजार होता. बांधकाम मजूर असलेल्या या तरुणाने त्याचे वडील, आई आणि पत्नी गमावले असल्यामुळे तो अत्यंत संकटात …

Read More »

पॅन कार्डला आधार सक्तीमुळे नागरिकांची तारांबळ

निपाणी परिसरातील चित्र : मुदत वाढवून देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने पॅनकार्ड- आधार लिंक करण्याची घोषणा केल्यानंतर 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता ३१ मार्चपर्यंत लिंक न केल्यास १ हजार रुपये पासून दहा हजार रुपये दंड करण्यासह पॅन क्रमांक निष्क्रिय होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निपाणी व …

Read More »

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमनी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमनी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा मंडळाचे चेअरमन श्री. तुकाराम हनुमंतराव साबळे उपस्थित होते, त्याचबरोबर शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य कालमनी गावचे श्रीपाद भरणकर, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत साबळे, मारुती साबळे, प्रभाकर साबळे, हनुमंत जगताप, नारायण गुंडू …

Read More »

समाधी मठातील चाऱ्याला अज्ञातांकडून आग

१२ ट्रॅक्टर चारा बचावला ; पोलिसात तक्रार दाखल निपाणी (वार्ता) : निपाणी- चिकोडी रोडवर असलेल्या समाधी मठामध्ये प्राणलिंग स्वामींच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपासून गोशाळा सुरू आहे. त्यामुळे गाई साठी शहर व परिसरातील अनेक भाविक देणगी दाखल चारा देत आहेत. पण भाविकांनी दिलेल्या या चाऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी रविवारी दुपारी दोन वाढण्याचा सुमारास …

Read More »