Monday , July 27 2026
Breaking News

कर्नाटक

मराठा मंडळ महाविद्यालयात युथ सप्ताहाचा सांगता समारोह समारंभ संपन्न

  खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर व FOCTAG व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19/01/2023 रोजी म. म. महाविद्यालयात युथ सप्ताहाचा सांगता समारोह समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. श्रीमती जे. के. बागेवाडी व प्रमुख अतिथी म्हणून खानापूर मधील नामांकित वकील श्री. विलास …

Read More »

रूमेवाडी येथे समुह संपन्मूल केंद्र होनकल अंतर्गत ‘अध्ययन महोत्सव’ अर्थात ‘कलिका हब्ब’ कार्यक्रमास सुरुवात

  खानापूर : कर्नाटक सरकारच्या वतीने कोरोनाच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अध्ययन पूर्णप्राप्ती योजना लागू करण्यात आली आहे. दिनांक 19-01-2023 ते 20-01-2023 या कालावधीत सरकारी मराठी प्राथमिक शाळा रुमेवाडी येथे समूह संपन्मूल केंद्र होनकल अंतर्गत 16 शाळांमधील निवडक 120 मुलांसाठी अध्ययन पूर्णप्राप्ती समाजासमोर उलगडण्यासाठी अध्ययन महोत्सवाचे आयोजन करण्यात …

Read More »

आमची प्राथमिकता केवळ विकासाला, ‘व्होट बँके’ला नाही

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; यादगीर जिल्ह्यात विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी भाजप सरकारचे प्राधान्य केवळ विकासाला असल्याचे प्रतिपादन केले. कर्नाटकावर राज्य केलेल्या इतर पक्षांच्या सरकारांनी केवळ “व्होट बँक”चे राजकारण केल्याचा आरोप करून राज्यातील काही प्रदेशांच्या मागासलेपणासाठी त्यांच्यावर निशाणा साधला. यादगीर जिल्ह्यातील कोडेकल येथे राष्ट्रीय …

Read More »

त्वचा विकार शास्त्रविद्यासाठी डॉ. निधी मेहता यांची निवड

निपाणीतील पहिली विद्यार्थिनी : सरकारी कोट्यातून निवड निपाणी (वार्ता) : येथील उमेश मेहता यांची कन्या डॉ. निधी मेहता यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाकरिता नवी दिल्ली येथील ख्यातनाम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) वैद्यकीय शिक्षण संकुलातील डर्मोटोलॉजी (त्वचा विकार शास्त्र) या विद्याशाखेमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश मिळविला आहे. हा प्रवेश …

Read More »

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला साखर उद्योग!

‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांची मंडलिक साखर कारखान्याला दिली भेट निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कागल तालुक्यातील सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी साखर उद्योग जाणून घेतला. मॉडर्न इंग्लिश स्कूलच्यामाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ९ ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य स्नेहा घाटगे …

Read More »

बोरगाव होम मिनिस्टर पैठणीच्या प्रीती पाटील ठरल्या मानकरी

बोरगाव (वार्ता) : येथील वितराग महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा व होम मिनिस्टर स्पर्धेत अंतिम क्षणी प्रीती राजगोंडा पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या. मीनाक्षी रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू कार्यक्रमाबरोबरच होम मिनिस्टर व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन …

Read More »

हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या बगॅसला आग; १.५ कोटीचे नुकसान

अग्निशामक दलाच्या ७ वाहनाद्वारे आग आटोक्यात निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेदहा वाजता सुमारास अचानक आग लागली. निपाणी, चिकोडी संकेश्वर, बिद्रीसह अग्निशामक दलाच्या सात वाहनाद्वारे तासाभरात ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये साखर कारखान्याचे १.५ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत अग्निशामक दलाकडून …

Read More »

महिलाच सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात; डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : महिलांनी त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांप्रति जागरूक असले पाहिजे. एक स्त्रीच चांगला समाज घडवू शकते. स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. खानापूर तालुक्यात 54 टक्के महिला मतदार आहेत. समस्त महिला आपल्या हक्क व जबाबदरीप्रति जागरूक असतील तर महिला सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात, असे मत भाजपा …

Read More »

नंदगड येथे मालमत्तेच्या वादातून एकाची हत्या

  खानापूर : मालमत्तेच्या वादातून भाऊबंदांनी एकाची हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली. यल्लाप्पा संताराम गुरव (वय 33 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळी कोडल गावच्या वेशीवरील एका घरात सदर खुनाचा प्रकार घडला आहे. मालमत्तेच्या वादातून …

Read More »

नियती फौंडेशच्या वतीने इटगी येथे हळदीकुंकू समारंभ

  खानापूर : महिलांना रोजच्या व्यावहारिक जीवनातून थोडा निवांतपणा मिळावा, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. त्यासाठी हळदीकुंकूसारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या. नियती फौंडेशच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटगी येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियती फौंडेशनच्या …

Read More »