Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

बेळगाव-चोर्ला महामार्गावर झाडे कोसळली; वाहतूक बंद

  खानापूर : बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमनी गावाजवळ मोठी झाडे कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद पडली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमणी गावाजवळ एकाचवेळी दोन मोठी झाडे कोसळली. त्यामुळे बेळगाव-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा …

Read More »

मुख्यमंत्री बदलाची शक्यता भाजपने फेटाळली

  गैरसमज पसरविण्याचा कॉंग्रेसवर आरोप बंगळूर : कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाबाबत अनुमान काढल्याबद्दल काँग्रेसची निंदा करताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी, कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केला. विशेषत: महसूल मंत्री आर. अशोक यांनी स्पष्ट केले, की बोम्मई मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. २०२३ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल. हिंमत असेल तर …

Read More »

खानापूर विद्यानगरात “हर घर तिरंगा” राष्ट्रध्वजाचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी दि. १३ ते सोमवारी दि. १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरा घरात तिरंगा राष्ट्रध्वज फडकावावा. या उद्देशाने खानापूर नगरपंचायतींच्या वतीने विद्यानगरात तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक नारायण मयेकर, नगरपंचायतींचे अधिकारी प्रेमानंद नाईक, याच्याहस्ते तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण आले. यावेळी प्रत्येक घरोघरी तिरंगा राष्ट्रध्वजाचे …

Read More »

माडीगुंजी शाळेत सेवानिवृत्त शिक्षक ए. एम. पत्तार यांना निरोप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील माडीगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत सेवानिवृत्त कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गुंडू गोरल होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम देसाई, सीआरपी बी. ए. देसाई, ग्राम पंचायत सदस्या सौ. …

Read More »

ऐरणीच्या देवाला जुन्या हिन्दी गाण्याची आवड..

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर कार्पोरेशन बॅंकेजवळच्या ऐरणीच्या देवाला जुन्या हिन्दी चित्रपटातील सदाबहार गाण्यांची मोठी आवड दिसताहे. येथील छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये कृष्णा लोहार विषयावर घाव घालून शेतकऱ्यांना लागणारी औजारे तयार करून देण्याचे कार्य करत आहेत. गेली तीस वर्षे सरली त्यांची किसान सेवा सुरू आहे. ते दगडी कोळशाने भाता पेटवून …

Read More »

संकेश्वरात बाईक रॅलींने “हर घर तिरंगाचा” संदेश

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी तिरंगा बाईक रॅलीला चालना दिली. नगरसेवकांची बाईक रॅली सर्व प्रभागात “हर घर तिरंगा” चा संदेश घेऊन पोचलेली दिसली. नगरसेवक हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय …

Read More »

संकेश्वर पालिकेतर्फे हिरण्यकेशीचे गंगा पूजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज हिरण्यकेशी नदीच्या नव्या पाण्याचे गंगा पूजन करण्यात आले.संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हिरण्यकेशी गंगा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. पुरोहित संतोष जोशी यांच्या मंत्रोच्चारात नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांनी हिरण्यकेशीचे गंगा …

Read More »

कृष्णा, उपनद्यांच्या पातळीत 3 फुटांनी वाढ

  बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच असून या पार्श्वभूमीवर चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील कृष्णा नदीसह वेदगंगा आणि दूधगंगा या उपनद्यांची पाणीपातळी 3 फुटांनी वाढली असून, पाणी शेतजमिनीत पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आज पाण्याची पातळी पुन्हा 3 फुटांवर गेली आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या काठावर. तसेच …

Read More »

हमीभाव ठरविण्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट हवी : राजू पोवार

  ढोणेवाडीत रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकर्‍यांना कोणीच वाली नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय अत्याचार केला जात आहे. त्यासाठी शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटीत नसल्याने पीकाना हमीभाव दलाला ठरवितो. त्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडत आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय व हक्क मिळवून …

Read More »

सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

सुनील पाटील : 11 फुट नारळाची गणेश मूर्ती निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील श्रीगणेश मंडळातर्फे गेल्या वर्षापासून 50 गणेश उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नारळाची 11 फुटी गणेश मूर्तीसह विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील …

Read More »