Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

श्रीक्षेत्र वल्लभगड येथून पायी दिंडीचे प्रस्थान

संकेश्वर (महंमद मोमीन) : श्रीक्षेत्र वल्लभगड येथून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे प्रस्थान झाले. वल्लभगड श्रीराम मंदिर येथे दिंडी चालक हभप हैबती वाघमोडे यांनी विणापूजन करुन दिंडी सोहळ्याला चालना दिली. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली वल्लभगड पायी दिंडी सोहळा …

Read More »

बरगाव पंचायतीला टाळे ठोकताच पीडिओंनी दिले कामे करण्याचे आश्वासन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बरगाव पंचायतीकडून नागरिकांची कोणतीच कामे केली जात नव्हती. त्यामुळे बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील नागरिक हैराण झाले होते. त्याचबरोबर बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील के. पी. पाटील प्लॉटमधील नागरिकांना उतारे देण्यास टाळाटाळ होत होती. गेली अनेक वर्षे उतारा मिळण्यासाठी के. पी. पाटील यांनी सतत बरगाव ग्राम पंचायतीला …

Read More »

सीमाभागातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी

निपाणी शिवसेनेचे पत्रक : प्रसंगामध्येही सावरले राज्याला निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापत चालले आहे. तरीही सीमाभागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे पत्रक बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकातील माहिती अशी, कांही स्वार्थी मंत्र्यांच्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होत आहे. हिंदहृदय …

Read More »

रिक्षा अपघातातील मृताच्या वारसांना 22 लाखाची मदत

निपाणी (वार्ता) : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील रहिवाशी व रिक्षाचालक शैलेश मनोहर पारधे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले होते. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. त्यानुसार विमा कंपनीकडून 15 लाख 5 हजार …

Read More »

आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीतर्फे कागल एस.टी. आगारप्रमुखांना निवेदन!

कोगनोळी : आप्पाचीवाडी व हदनाळ कर्नाटक सीमाभागातील दोन्ही गावातील बरेच विद्यार्थी हे कागल येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु सध्या कागल आगाराकडून आप्पाचीवाडी-म्हाकवेमार्गे हदनाळ या गावाला ठराविक बसफेऱ्या सोडून विद्यार्थांच्या सकाळच्या कॉलेजच्या वेळेत व दुपारी परत गावाकडे येण्याच्या वेळेत एसटी बससेवा नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होत आहे. ही …

Read More »

शिरोली मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महादेव राऊत

खानापूर (प्रतिनिधी) : शिरोली (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्षपदी महादेव राऊत यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रेमी व भाजप नेते श्रीपाद शिवोलकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला एसडीएमसी उपाध्यक्ष प्रिया पवार, सदस्य दत्तात्रय राऊत, अमृत गुरव, दिपक देसाई, धाकलू पाटील, धनापा नंदगडकर, …

Read More »

इनरव्हील क्लब आणि लॉज व्हिक्टोरिया नं -9 (ब्रदरहुड) द्वारे (ग्रामीण शिक्षण अभियान) अंतर्गत तळावडे आणि गोल्याळी गावात ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून रेनकोट वाटप

खानापूर : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे तळवडे आणि गोल्याळी गावात ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून पश्चिम घाटातील घनदाट वनक्षेत्रात येणाऱ्या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच नोट बुक्स लॉज व्हिक्टोरिया – 9 (ब्रदरहुड) तर्फे वितरीत केले. हे दोन्ही उपक्रम ‘ऑपरेशन मदत’ च्या …

Read More »

‘एक सीमावासी-लाख सीमावासी’ खानापूर तालुक्यात महामोर्चाची नियोजनबद्ध जनजागृती, शेकडो नागरिकांची उपस्थिती

तालुक्यात समितीमय वातावरण : तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत. सरकारी कार्यालयांवरील व बसेसचे बोर्ड गावांचे नाव फलक मराठीमध्ये असावेत. या मागणीसाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या 27 जून रोजी यशस्वी मोर्चा झाला. या मोर्चाची जनजागृती करण्याची संपूर्ण जबाबदारी ही मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या घटक …

Read More »

संकेश्वरातून विठूरायाच्या नाम गजरात पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. संकेश्वरात कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली पंढरपूर पायी वारीचे भाग्य वारकरींना लाभले नव्हते. यंदा मात्र विठ्ठलाच्या कृपेने वारकरींना …

Read More »

कोगनोळीच्या भाविकांनी घेतले नालंदा येथील महावीर मोक्ष भूमीचे दर्शन

कोगनोळी : येथील ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने सम्मेद शिखर्जी मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये एकशे तीस भाविकांचा समावेश असून सम्मेद शिखरजी येथील जैन मंदिराचे दर्शन घेऊन बिहार येथे असणार्‍या नालंदा पावापुरी येथील भगवान महावीरांच्या मोक्ष स्थळाचे दर्शन घेतले. कुरुंदवाड येथील प्रदीप मगदूम यांनी भगवान महावीर यांची …

Read More »