Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

प्रभाग १३ ची निवडणूक नको समझोता हवा…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. उद्या गुरुवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. येथील दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या दुःखद घटनेचा विचार करता भाजपाचे नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, …

Read More »

गर्लगुंजी माऊली यात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी दि. ११ रोजी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. मंगळवारी दि. १० रोजी सायंकाळी माऊली देवीची पालखी माऊली मंदिराकडे प्रयाण झाली. त्यानंतर माऊलीदेवीची विधीवत पुजा होऊन गाऱ्हाणा घालुन यात्रेला सुरूवात झाली. बुधवारी दि. …

Read More »

स्वाभिमानाने जगले पाहिजे : खासदार शरद पवार

बेळगाव : ब्रिटिशांच्या विरोधात वीरराणी कित्तूर चन्नम्मा या स्वाभिमानाने लढल्या. त्यांच्या स्वाभिमानामुळेच आज देशाला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येकाने लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. अंकली (तालुका चिकोडी) येथे काल मंगळवारी वीरराणी कित्तूर चन्नम्मा पुतळ्याचे अनावरण, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या मद्यार्क निर्मिती …

Read More »

संकेश्वरात जय भवानी जय शिवाजीच्या गजरात सात तास मिरवणूक

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात तब्बल दोन वर्षानंतर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात, डाॅल्बीच्या दणदणाटात अभूतपूर्व उत्साही वातावरणात गावातील प्रमुख मार्गे शिवजयंती मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत डाॅल्बीच्या दणदणाटात शिवगितांच्या तालावर युवक नृत्यांत रममाण होऊन गेलेले दिसले. मिरवणुकीत भगवे ध्वज, शिवरायांचा जयजयकार आणि डाॅल्बीच्या आकर्षक दिव्यांचा झगमगाट लक्षवेधी ठरलेला दिसला. सजविलेल्या …

Read More »

विधान परिषदेच्या ७ जागांसाठी ३ जूनला मतदान

बेंगळुरू : विधान परिषदेच्या ७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ३ जून रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना १७ मे रोजी काढण्यात येणार आहे. २४ मे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेचे सदस्य भाजपचे लक्ष्मण सवदी, लेहर …

Read More »

हब्बनहट्टीत श्रीकृष्ण मंदिराचे थाटात उद्घाटन

खानापूर : येथील हब्बनहट्टी गावात श्रीकृष्ण मंदिराचे थाटात आणि उत्साहात उद्घाटन करण्यात आले. जवळपास तीन दिवस हब्बनहट्टी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी तिसऱ्या दिवशी नाटक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी आणि डॉ. गणपत पाटील उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांच्या …

Read More »

नेत्रदान-देहदान करायला हवे : श्री शंकराचार्य

संकेश्वर (प्रतिनिधी) : नेत्रदान, देहदान अवयवदान करुन जीवन सार्थक करायला हवे असल्याचे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. येथील श्री साईभवनमध्ये आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला चालना देऊन स्वामीजींनी नेत्रदानाचे महत्व समजावून सांगितले. अध्यक्षस्थान संकेश्वर ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, योगशिक्षक बसवराज …

Read More »

संकेश्वर प्रभाग १३ ची निवडणूक चौरंगी होणार?

छाननीत पाच अर्ज वैध संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग १३ करिता पोटनिवडणूक होत आहे. आज छाननीत 9 पैकी 5 अर्ज वैध ठरविण्यात आले. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार असे शिवानंद उर्फ नंदू मुडशी (भाजप), ॲड. प्रविण एस. नेसरी (काॅंग्रेस), शिवानंद लक्ष्मण समकण्णावर (निधर्मी जनता दल) अमृतराज उर्फ रोहण नेसरी (अपक्ष), …

Read More »

नंदू मुडशी यांचेकडून हुक्केरी तालुका स्केटिंगपटूंचा सत्कार..

संकेश्वर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील GRSA स्केटिंग रींक वर घेण्यात आलेल्या ‘समर व्हेकेशन स्पीड रोलर’ स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या संकेश्वर (शाखा) स्केटरनी घवघवीत यश संपादन केले आहे. विजेत्या स्केटिंगपटूंना संकेश्वर ए.पी.एम.सी. संचालक नंदू मुडशी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी स्केटरना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. …

Read More »

राशींगच्या महिलेला दिले जगण्याचे बळ

बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे मदत : दिले तीन महिन्याचे अन्नधान्य निपाणी (विनायक पाटील) : राशिंग (ता. हुक्केरी)  येथील रहिवासी बाबुराव मारुती चौगुले (वय४५) यांचे चार दिवसापूर्वी आकस्मिक निधन झाले आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही बाब …

Read More »