Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

गोमटेश स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित निपाणी हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते. अश्विनी हत्ती यांनी स्वागत केले. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. …

Read More »

बोरगाव आर. ए. पाटील सीबीएससीचा दहावी निकाल १०० टक्के

अध्यक्ष उत्तम पाटील : श्रीवर्धन इजारे प्रथम निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम सीबीएसई पॅटर्नचे ज्ञान मिळावे. विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावेत, यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. शाळेच्या …

Read More »

सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा उद्या निपाणीत गौरव समारंभ

निपाणी (वार्ता) :  भारतीय सेनेतून शांती सेनेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात निपाणीचे सुपुत्र सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण यांच्या युनिटने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या विशेष बहुमानाबद्दलनिपाणी शहरवासीयांच्या वतीने त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेत गुरुवारी (ता.२८) गौरव समारंभाचे आयोजन केले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून इंडियन रॅपिड रिप्लायमेंट म्हणून दक्षिण …

Read More »

संकेश्वर सीबीएसई शाळेचा शंभर टक्के निकाल

  संकेश्वर (महंमद मोमीन) :  संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के पाटील सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळेचा दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. आदित्य नार्वेकर या विद्यार्थ्यांने ९९ % गुण मिळवून राज्यात तिसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून …

Read More »

संकेश्वरात शहिदांना अभिवादनाने कारगिल विजयोत्सव साजरा.

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कमतनूर वेस येथील राहुल भोपळे सर्कल येथे कारगिल युध्दातील शहीद जवानांना तसेच संकेश्वरचे शहीद जवान राहुल भोपळे, सतीश सुर्यवंशी यांना शतशः नमन करून कारगिल विजयोत्सव साजरा करण्यात आला. युवानेते प्रदीप माणगांवी यांनी शहीद जवान स्मारकाची पूजा करुन अभिवादन केले. नगरसेवक सचिन भोपळे, नेताजी आगम …

Read More »

आ. निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पेयजल योजना जारी : महादेव कोळी

  भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न खानापूर : बहुग्राम पेयजल प्रकल्प योजनेसाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 2018 पासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना त्यांना यश आले असून देगाव पेयजल प्रकल्पासाठी 565 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भाजपने याचे श्रेय फुकटात लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला खानापूर काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी दयानंद वाणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या अध्यक्षपदी दयानंद वाणी तर उपाध्यक्षपदी सौ. स्वाती भांतकांडे यांची निवड केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर होते. प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एस. एम. पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास; मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन

कोगनोळी : चूल आणि मूल यातून महिलांनी बाहेर पडून उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कार शिकले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. येथील प्रियंका संकेश्वरे व महेश संकेश्वरे या दाम्पत्यांना मंत्री जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाख रुपये मंजूर झालेल्या बेकरी …

Read More »

संशयित दहशतवादी अख्तरला बंगळूरात अटक; त्याच्या संपर्कातील अन्य तिघांनाही ताब्यात

  बंगळूर : सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाणारे राजधानी बंगळुर शहर आता दहशतवाद्यांचे अड्डे बनत असल्याची भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये एका दहशतवाद्याला पकडल्यानंतर सीसीबी पोलिसांनी काल रात्री (रविवारी) टिळक नगरमध्ये लपून बसलेल्या एका संशयित दहशतवाद्याला पकडले आहे. शहर पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले की, टिळकनगर येथे …

Read More »

गोकाक पोलिसांकडून मंगळसूत्र चोरीचा तपास; दोघांना अटक

मंगळसूत्र, दोन दुचाकी अंदाजे किंमत 3 लाख 55 हजार रुपये जप्त संकेश्वर (महंमद मोमीन) : गोकाक गावात गेल्या महिनाभरापासून झालेल्या चोरीचा तपास लावण्यात गोकाक पोलिसांना यश मिळाले आहे. गोकाक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल आर. राठोड यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून दोघा चोरांना गजाआड करुन ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, दोन दुचाकी …

Read More »