Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

निवृत्त राज्य पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या

पत्नीकडूनच हत्या झाल्याचा संशय बंगळूर : निवृत्त पोलिस महासंचालक (डीजी आयजीपी) ओम प्रकाश यांची त्यांच्याच पत्नीने चाकूने वार करून हत्या केली. ही घटना बंगळुरमधील एचएसआर लेआउटमधील एका घरात घडली. कर्नाटक केडरचे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांनी राज्याचे डीजी आणि आयजीपी म्हणून काम केल्यानंतर २०१५ मध्ये निवृत्ती घेतली. …

Read More »

ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन

  ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेत आज शुक्रवार दिनांक 18 रोजी रात्री आठ वाजता भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रेचा मुख्य दिवस दिनांक 19 एप्रिल रोजी …

Read More »

जातनिहाय जनगणती अहवाल : निर्णय न होताच मंत्रिमंडळ बैठकीची सांगता

  लेखी अभिप्राय देण्याची सूचना; अहवालावर मंत्र्यांमध्ये मतभेद बंगळूर : जात जनगणना अहवाल लागू करण्यासाठी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या अहवालावर मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बैठकीत निश्चित स्वरूपाचा कोणताच निर्णय न घेता, सर्व मंत्र्यांना लेखी अभिप्राय देण्यास सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठक आटोपती …

Read More »

ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा 16 ते 21 एप्रिलपर्यंत

  ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक – महाराष्ट्र सीमाभागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा बुधवार दिनांक 16 रोजी सायंकाळी आठ वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कर बांधून सुरुवात करण्यात आली. यात्रेचा मुख्य …

Read More »

इयत्ता पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी वयोमर्यादेत सवलत; कर्नाटक शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  बेंगळुर : पालकांच्या मागणीनंतर कर्नाटक शासनाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी वयोमर्यादेत तात्पुरती सवलत दिली आहे. शिक्षण खात्याने पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण होण्याची अट घातली होती. पण आता शिथिलता आणून ती आता 5 वर्षे 6 महिने वय पूर्ण आणि युकेजी (UKG) पूर्ण केलेली मुले यावर्षी …

Read More »

मुडा भूखंड घोटाळा : लोकायुक्तांना चौकशीचे न्यायालयाचे आदेश; सिद्धरामय्यांना धक्का

  ‘बी’ रिपोर्टवर सुनावणी तहकूब केल्याने काहीसा दिलासा बंगळूर : मंगळवारी बंगळुर येथील लोकप्रतिनिधींसाठीच्या विशेष न्यायालयाने लोकायुक्त पोलिसांना म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का बसला आहे. तथापी, मुडा घोटाळ्याबाबत लोकायुक्तांनी सादर केलेल्या ‘बी’ रिपोर्टवर लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने कोणताही अंतिम …

Read More »

संविधान रक्षणासाठी काँग्रेसचा नेहमीच संघर्ष : डॉ. अंजली निंबाळकर

  पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोव्यातील पणजी येथे काँग्रेसतर्फे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण करताना सांगितले की, आज महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संविधानाच्या रक्षणासाठी, …

Read More »

बिडी येथील वृद्ध दाम्पत्य आत्महत्या केल्याप्रकरणी गुजरात येथून एकाला अटक

  बेळगाव : सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉलवरून लाखो रुपये उकळलेल्यावरून बिडी येथील वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याप्रकरणी छडा लावण्यात नंदगड पोलिसांना यश आले असून गुजरात राज्यातील सुरतमधून एकाला ताब्यात घेतले आहे. गुजरातमधील सुरत येथील चिराग जीवराजबाई लक्कड याला अटक केली आहे. त्याला नंदगड पोलिस स्टेशन गुन्हा क्र. 32/2025 अंतर्गत आयटी कायद्याच्या …

Read More »

जात जनगणना अहवालावर मंत्रिमंडळातील चर्चेनंतर बोलेन : सिद्धरामय्या

  बंगळूर : येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत जात जनगणना अहवालावरील चर्चेनंतरच मी या विषयावर बोलेन. तोपर्यंत, मी त्याशी संबंधित कोणत्याही विषयावर भाष्य करणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले. या एकाच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही १७ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. आम्ही तिथे चर्चा …

Read More »

जात जनगणना अहवाल : ओबीसी आरक्षण ३२ टक्क्यावरून ५१ टक्के करण्याची शिफारस

  इतर आरक्षणाताही वाढीची शिफारस बंगळूर : राज्यात मागासवर्गीयांची (ओबीसी) लोकसंख्या ६९.६० टक्के आहे. के. जयप्रकाश हेगडे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या अहवालात या लोकसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण दर सध्याच्या ३२ टक्क्यांवरून ५१ टक्के करण्याची सरकारला शिफारस करण्यात आली आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल-२०१५ च्या आधारे …

Read More »