खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावच्या शिवारातील विद्युत खांब्याच्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिणगी पडून जवळपास २० ते २५ कर जमिनीतील ऊस शुक्रवारी दि. ४ रोजी जळून खाक झाला. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, करंबळ गावच्या पट्टीतील ऊसाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी विद्युत खांबावरील ताराचे वाऱ्यामुळे एकमेकाचे घर्षण झाले व …
Read More »चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जिम उद्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
सावधगिरीच्या उपाययोजना कायम बंगळूर : कोविड-१९ प्रकरणांची सध्याची स्थिती आणि हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण विचारात घेऊन राज्य सरकारने उद्या (ता. ५) पासून जिम, योग केंद्र, सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रसारामुळे तिसरी लाट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली, तेव्हा हे …
Read More »संकेश्वरात माघी गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर परिसरातील सर्वच श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. मठ गल्ली गजानन मंदिर सांस्कृतिक भवन येथे श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली. श्री गणेश जयंती निमित्त येथे पुरोहित नरेंद्र उपाध्ये यांनी पूजा अभिषेक करुन महाआरती सादर केली. त्यांनी सकल भक्तगणांना सुख शांती …
Read More »संकेश्वर अंकले रस्ता शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. शाळा सुधारणा समिती, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय मुलींनी आपल्या आईची पाद्यपूजा करुन आर्शीवाद घेतला. सभेत शिक्षिकांनी उपस्थित मातांची ओटी भरुन हळदीकुंकू कार्यक्रम पार पाडला. सभेत सीआरपी एम. …
Read More »संकेश्वर कमतनूर वेसीत तोबा गर्दी…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजार दिवशी कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि बाजार पेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार रमेश कत्ती यांनी राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये भाजी बाजार भरविणेचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असल्याची चर्चा आज बाजारात लोकांतून होताना दिसली. …
Read More »बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट देणाऱ्यांवर कारवाई
निपाणी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करुन देणाऱ्यावर निपाणी पोलिसांनी कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका सुरू आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतून …
Read More »खानापूरात दाट धुके, वातावरणात बदल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटेपासून धुके पडण्यास प्रारंभ झाला. पहाटेच्यावेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना धुक्याचा अनुभव आला. धुके पडल्याने महामार्गावर वाहनचालकांना वाहनाना दिवे लावून वाहने चालवावी लागली. धुक्यामुळे काजू, आंबा झाडाना आलेला मोहोर जळुन जाण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविण्यात येत आहे. यावर्षी काजू, आंब्याच्या झाडाना …
Read More »कोडचवाडात शाॅर्टसर्किटमुळे ऊसाला आग; लाखोचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : कोडचवाडात (ता. खानापूर) येथील सर्वे नंबर ११५ मधील शिवारातील दोन एकर जमिनीतील ऊसाच्या फडाला गुरुवारी दि. ३ रोजी दुपारी २ वाजता कोडचवाडचे शेतकरी देवेंद्र बाळापा कोलेकर यांच्यात शेतातील ट्रान्सफॉर्मरात शाॅर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडून ऊसाच्या फडाला आग लागली . त्यामुळे दोन एकर जमिनीतील जवळ पास ३०ते ४० टन …
Read More »खानापूर-जांबोटी क्राॅसवर तब्बल दोन वर्षापासून पॅचवर्क
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर जत- जांबोटी महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याने रस्ता तसाच नादुरूस्त अवस्थेत आहे. अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. की गटारी झाली नाही. त्यातच सीडीचेही काम अद्याप झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम झालेच नाही. केवळ या रस्त्यावर खडी पसरून नावापुरतेच …
Read More »आक्षेपार्ह सीडी प्रकरण; चौकशी अहवाल सादर करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
बंगळूर : माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) दंडाधिकारी न्यायालयात अंतिम अहवाल सादर करावा असे न्यायालयने निर्देश दिले आहेत. बंगळुरमधील कब्बन पार्क पोलिस स्थानकामध्ये रमेश जरकीहोळीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta