Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

संकेश्वरात पतंजलीची इकोफ्रेंडली रंगपंचमी, खेडोपाड्यात अमाप उत्साहात रंगोत्सव साजरा..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. योगगुरु आणि योग साधकांनी एकमेकांना पर्यावरण पुरक रंग लावून रंगोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. योगशिक्षक पुष्पराज माने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले पतंजली योग समितीतर्फे आज इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. सणसमारंभ त्या-त्या दिवशीच साजरे करायला हवे. हिंदू धर्मात होळी, …

Read More »

मोटरसायकल अपघातात मणतुर्गा येथील युवक गंभीर जखमी

बेळगाव : भरधाव मोटरसायकल रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात एक युवक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटल समोर घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव गजानन कल्लाप्पा देवकरी (वय 22, रा. मणतुर्गा, खानापूर) असे आहे. गजानन आणि त्याचा मित्र आज मंगळवारी दुपारी 2:35 …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीसंदर्भात 24 रोजी बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची एकी करण्यासंदर्भात पंचसदस्यीय कमिटीच्या वतीने बैठक बोलाविण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांच्या प्रमुखांना लेखी पत्राद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. सदर बैठक गुरुवार दि. 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 2018 …

Read More »

खानापूर तालुक्यातील ग्रा. पं. कडून मिळाणाऱ्या घरासंदर्भात ता. पं. ला निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतमधून १६३० घरे मंजुर करून तालुक्याच्या आमदारानी १० घरे प्रत्येक ग्राम पंचायतीला आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावे घर मंजुरीसाठी दिली आहे. हा ग्राम पंचायत सदस्यावर अन्याय आहे. तेव्हा तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्याना विश्वासात घेऊन संबंधित ग्राम पंचायतीच्या पीडिओ अधिकाऱ्यानी आमदार …

Read More »

संगीतप्रेमी रमेश कत्ती…

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती हे यल्लीमन्नीळी येथील मुस्लिम समाजाच्या एका विवाह समारंभात सहभागी झाले होते.विवाह समारंभात दुल्हन बिदाई प्रसंगी बाबुलकी दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले या गीताची धून सुरु करताच रमेश कत्ती त्या गाण्यात तल्लीन होऊन गेले. त्यांनी …

Read More »

भरतीत मराठी शिक्षकांनाही प्राधान्य द्या : खानापूर युवा समिती

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. खानापूर …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या.  प्रारंभी कार्तिक पाटील याने स्वागत केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळातील अनुभव सांगितले.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून …

Read More »

उन्हाळ्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली!

किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये नग : दरात दुप्पटीन वाढ निपाणी (वार्ता) : उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते, तसेच गारवा मिळतो. उन्हाच्या तडाख्यापासून काही वेळासाठी सुटका होते. लाल बुंद असणाऱ्या टरबुजाचे निपाणी बाजारात यंदादर  वाढले असून ६० ते ७० रुपये नग …

Read More »

हिजाब वाद; निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना जिवे मारण्याची धमकी

तिन्ही न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा, तामिळनाडूत एकास अटक बंगळूर : जिवे मारण्याच्या धमक्यांच्या मालिकेनंतर वादग्रस्त हिजाबच्या निकाला मागील तीन न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. हिजाब घालून निकाल देणाऱ्या मुख्य न्यायमूर्तींसह कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या आणि या संदर्भात तामिळनाडूतील …

Read More »

संकेश्वरात गोंधळी समाज नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गोंधळी समाज कमिटीकडून कर्नाटक गोंधळी समाज राज्य कार्यकारिणी सदस्य दत्ता महादेव दवडते, बेळगांव जिल्हा अध्यक्ष संदिप हरिभाऊ गोंधळी, बेळगांव जिल्हा सहसचिव शंकर नामदेव काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत रवि दवडते यांनी केले. यावेळी बोलताना दत्ता दवडते म्हणाले, संकेश्वर गोंधळी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी कंबर …

Read More »