Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

पोस्टाजवळ ट्राॅफिक जाम…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते शेट्टींमनी सिमेंट दुकानापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. डाव्या बाजूचा रस्ता हाॅटेल राजधानी पुढे शेट्टीमनी यांच्या सिमेंट दुकानापर्यंत करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता उजव्या बाजुच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. वन-वे रस्ता पार करताना पोस्टानजिक …

Read More »

खानापूर ता. प. कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खात्यावर अतिथी शिक्षकांचे मानधन जमा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात अतिथी शिक्षक म्हणून सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळात सेवा बजावत असलेल्या प्राथमिक शाळेतील ५३८ अतिथी शिक्षक तर माध्यमिक शाळेतील १७ अतिथी शिक्षकांचे मानधन सरकारने वितरित केले आहे. यासाठी ९.०४ लाखाचा निधी खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असुन लवकरच ते संबंधित प्राथमिक …

Read More »

माऊली एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक जयसिंग पाटील यांच्याकडून लक्ष्मी मंदिराच्या रंगकामासाठी धनादेश सुपूर्द

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून नव्याने बांधण्यात येत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या नुतन इमारतीच्या रंगकामासाठी गर्लगुंजी गावचे सुपुत्र व माऊली एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक जयसिंग कृष्णाजी पाटील यांनी पुढाकार घेऊन १,२५,५५५ रूपयाचा धनादेश श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकाम कमिटीकडे सोमवारी दि. २४ रोजी मंदिर बांधकाम कमिटीकडे सुपूर्द केला. …

Read More »

सर्वांच्या सहकार्याने सभापती पदाचा कार्यकाल पूर्ण

सद्दाम नगारजी : नूतन ११ सदस्यांची निवड निपाणी (वार्ता) : मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्यावर विश्वास ठेवून नगरपालिका सभापतीपदी निवड केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षाचा कार्यकाल सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने पूर्ण केला आहे. त्या काळात नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच शहराच्या …

Read More »

विरोधकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी : नगराध्यक्ष भाटले

सत्ताधारी गटाची बैठक निपाणी (वार्ता) : गेल्या पंचवीस ते तीस वर्षात निपाणीचा जो विकास झाला नाही, तो विकास  पाच वर्षात करून दाखवण्याचे काम मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी करून दाखविले आहे. शहरासह मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधी गटातील काही नगरसेवकांनी  बिनबुडाचे आरोप करून शहरवासीयांची …

Read More »

निपाणी नगरपालिका सभेत विविध विषयावर सकारात्मक चर्चा

२४ पाणी योजनेप्रमाणे बिल आकारू नये : सर्वच प्रभागात समान कामे निपाणी (वार्ता) : येथील निपाणी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २५) नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तब्बल सहा महिन्यांनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत कोणताही गोंधळ न होता विविध १२ विषयावर सकारात्मक चर्चा झाली. २४ तास पाणी योजनेचे पाणी अद्याप …

Read More »

कोगनोळी येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या

कोगनोळी : येथील काशीद गल्लीतील भाडोत्री घरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 24 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. किरण बाळासाहेब देसाई (वय 40) मुळगाव हडलगा तालुका गडिंग्लज सध्या राहणार कोगनोळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व नातेवाईक यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी …

Read More »

साथी हाथ बढाना…. अखेर सावकारांची जोडी जमली…

संकेश्वर (प्रतिनिधी) : गेल्या वर्ष दिड वर्षांपासून कत्ती बंधू आणि संकेश्वरचे उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांच्यात विरोधाभास निर्माण झाला होता. आता सावकारांच्या मनोमिलनाने तो दूर होताना दिसत आहे. यापूर्वीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी अप्पासाहेब शिरकोळी यांच्याशी हातमिळवणी करून साथी हाथ बढाना. असेच कांहीसे सांगत विरोध शमविण्याचा यशस्वी प्रयत्न करुन दाखविला …

Read More »

मंत्री कत्ती यांच्याकडून गौप्य मिटींगचा उलगडा….

संकेश्वर (प्रतिनिधी) : परवा झालेली गौप्य मिटींग आगामी तालुका- जिल्हा पंचायत निवडणूक तयारीची होती. त्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नव्हता, असे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले येथील तलाव सुधारणा आणि संकेश्वर हिरण्यकेशी नदी घाटावरील धोबी घाट निर्माण कार्याचा शुभारंभ करुन पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

महिलांनी टेन्शन फ्री जगावे : डॉ. स्मृती हावळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांंचे टेन्शनमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मानसिक दबावाखाली महिलांंचा दिनक्रम चालला आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत असल्याचे बेळगांव केएलई वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहप्राध्यापिका डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. त्या निडसोसी पाॅलिटेक्नीक काॅलेजमध्ये आयोजित लेडिज फोरम उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. …

Read More »