Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

मुडा घोटाळा : उच्च न्यायालयाने ईडी चौकशीला दिली परवानगी

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा अडचणीत? बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मुडा जमीन वाटप प्रकरणात माजी आयुक्त डी. बी. नतेश वगळता सर्व आरोपींची चौकशी करण्याची परवानगी दिली. मुडाचे माजी आयुक्त डी. बी. नतेश यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी …

Read More »

एडीजीपी हेमंत निंबाळकर मुख्यमंत्री पदकाने सन्मानित

  बेळगाव : बेळगावचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कर्नाटकचे विद्यमान गुप्तचर अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) आणि माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त हेमंत निंबाळकर यांना आज बुधवारी प्रतिष्ठेचे ‘मुख्यमंत्री पदक’ बहाल करून सन्मानित करण्यात आले. राजधानी बेंगलोर येथे आज कर्नाटक पोलीस ध्वज दिन दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी कर्नाटकातून नक्षलवादाचे …

Read More »

हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून खंडणी उकळणाऱ्या शिक्षिकेसह तिघांना अटक

  बंगळूर : राजकारण्यांच्या हनीट्रॅपच्या घोटाळ्याने खळबळ उडाली असतानाच येथील महालक्ष्मी लेआउटमध्ये हनीट्रॅपचे एक आगळे प्रकरण समोर आले आहे. एका खासगी प्रीस्कूल शिक्षिकेने प्रीस्कूलमध्ये येणाऱ्या मुलांच्या पालकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून एका वेळी ५० हजार रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षिकेसह तिघांना पोलिसांनी अटक केली …

Read More »

कर्नाटकात डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ

  पुन्हा एकदा दरवाढीचा धक्का बंगळूर : कर्नाटकातील दरवाढीमुळे लोक चिंतेत आहेत. १ एप्रिलपासून दुधाच्या किमतीत प्रति लिटर ४ रुपयांची वाढ झाली आहे. विजेचे दर वाढले आहेत. कचऱ्यावर सेस लावण्यात आला आहे. या सर्व अडचणींमध्ये, राज्य काँग्रेस सरकारने आता आणखी एक धक्का दिला आहे. कर्नाटकात आजपासून डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. …

Read More »

संकेश्वरात उत्साहात स्वामी समर्थ प्रकटदिन!

  संकेश्वर : संकेश्वर येथील दत्त पंत मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन दूरदुंडेश्वर भवनात साजरा झाला. सकाळी स्वामींच्या प्रतिमेचे पूजन व भूपाळी झाली. दरम्यान सारामृत पारायणाची पोथी २०० हून अधिक सेविकाऱ्यांनी वाचन केले. यावेळी नारायण फलसे, संतोष मगदूम यांच्याहस्ते महाआरती झाली. शंकराचार्य मठाचे सच्चिदानंद अभिनव …

Read More »

मणतुर्गे (ता. खानापूर) येथील श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन…

  खानापूर : मणतुर्गे (ता. खानापूर) येथे गुढीपाडव्या निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. …

Read More »

दूध, दही, वीज दरात आजपासून वाढ

  बंगळूर : राज्यातील जनतेला आज (ता.१) पासून दरवाढीचा फटका बसणार आहे. नंदिनीचे दूध, दही आणि वीजेचे दर आणखी महाग होतील. बस आणि मेट्रोचे भाडे आधीच जास्त असल्याने,आजपासून ग्राहकांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे. ऊर्जा विभागाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीमध्ये प्रति युनिट ३६ पैशांची वाढ केली आहे. दुसरीकडे, सरकारने नंदिनी …

Read More »

….अन् न्यामती बॅंक दरोड्यातील सोने सापडले तमिळनाडूतील विहिरीत

  सोन्याचे दागिने पाहून पोलिसही झाले थक्क बंगळूर : तामिळनाडूतील मदुराई येथील एका विहिरीत शेकडो चेन, नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या, ताली चेन आणि ब्रेसलेटसह एकूण १७ किलो सोने सापडले आहे. विशेष म्हणजे हे सर्व सोन्याचे दागिने दावणगेरे येथील न्यामती बँक दरोडा प्रकरणातील असल्याचे समजते. तामिळनाडूतील एका विहिरीत सापडलेले १७ किलो सोने …

Read More »

सणाच्या दिवशी शोकांतिका; कृष्णा नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू

  बागलकोट : गुढीपाडवा सणाच्या दिवशी कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. तिघेही बागलकोट तालुक्यातील इल्याळ गावातील रहिवासी आहेत. बागलकोट जिल्ह्यातील सीतीमनी गावात ही दुर्घटना घडली. सोमशेखर बोमण्णा देवरमनी (वय १५) याचा मृतदेह सापडला असून मल्लप्पा बसप्पा बगली (वय १५), परनगौडा मल्लप्पा बिळगी …

Read More »

हुतात्मा भवन भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खानापूर समितीचे आवाहन

  खानापूर : स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार …

Read More »