Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

‘द्वेषपूर्ण भाषण’ विधेयकाला केंद्राचा आक्षेप

  विद्यमान कायदेच पुरेसे असल्याचे मत बंगळूर : राज्यातील ‘द्वेषपूर्ण भाषण’ रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कर्नाटक द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेष अपराध (प्रतिबंध) विधेयक, २०२५ या महत्त्वाच्या विधेयकाला केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे. या टप्प्यावर स्वतंत्र कायद्याची आवश्यकता नसून विद्यमान कायदेशीर चौकटच या समस्येवर उपाय करण्यास सक्षम असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य …

Read More »

नेसरीकर प्लॉट रेणुका मंदिर परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणीचा शुभारंभ

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नेसरीकर प्लॉटमधील रेणुका मंदिर परिसरात नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी बगीचा निर्मिती उपक्रमाचा प्रारंभ भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, परिसरात वाढते प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रत्येक …

Read More »

सहकाररत्न उत्तम पाटील प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत ममदापूर केएल मधील साई स्पोर्ट्स क्लब विजेता

  निपाणी (वार्ता) : ममदापुर (के.एल.) येथील एस. टी. बॉइजतर्फे उत्तम पाटील प्रीमियर लिग २०२६ मधील चौथ्या पर्वातील क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये ममदापूर (के.ए.) येथील साई स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांकाचे २५ हजार रुपये आणि चषक पटकाविले. सहकाररत्न उत्तम पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीसे देण्यात आली. …

Read More »

डंपर – दुचाकी अपघातात रांगोळीचा युवक ठार; मानकापूर जवळील घटना

निपाणी (वार्ता) : कारदगा-मानकापूर फाट्याजवळ डंपर व मोटारसायकलची धडक होऊन रांगोळी येथील महाविद्यालय विद्यार्थी ठार झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. गणेश बाबासाहेब कांबळे (वय १८) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अर्जुन रमेश मिरजे (वय १८) साहिल कुबेर कांबळे (तिघेही रा. रांगोळी) गंभीर जखमी झाले आहेत. अर्जुन मिरजे …

Read More »

कायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरा करण्याचे निपाणी पोलीस उपनिरीक्षकांचे आवाहन

  निपाणी (वार्ता) : कायदा व नियमाच्या चौकटीत बकरी ईद सणाचे महत्त्व जोपासून हा सण शांततेत साजरा करा. हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जोपासावा, असे आवाहन पोलीस उप निरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी केले. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. निपाणी परिसरात अनेक सण उत्सव हिंदू-मुस्लिम बांधवांच्यावतीने …

Read More »

अधिक मासानिमित्त निपाणी परिसरात जावई बापूंच्या आदरतिथ्याची लगबग

  निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या अधिक मासानिमित्त सध्या निपाणी परिसरात घरोघरी जावईबापूंच्या आदरातिथ्याची लगबग सुरू आहे. या महिन्यात जावयाला आंब्याच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद देत विविध प्रकारचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार जावयाला विष्णूरूप मानून घरी जेवण देण्यासह आर्थिक कुवतीनुसार तांब्याचे ताम्हण, …

Read More »

निपाणी तालुक्यात ९८ टक्के पाठ्यपुस्तके दाखल

  निपाणी तालुक्यातील ५२ हजार ७५७ विद्यार्थ्यांना लाभ; उन्हाळी सुट्टीतच वाटप सुरू निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील पाचवी ते दहावी वीच्याविद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी शासनातर्फे शिक्षण खात्याने मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळावा, यासाठी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने केलेल्या नियोजनानुसार पाठ्यपुस्तकांची पहिली गाडी शहरात दाखल झाली आहे. त्यानुसार, शाळाशाळांमध्ये या पुस्तकांचे सुयोग्य …

Read More »

उद्या सकाळी ११ वाजताचा मुहूर्त ठरला; सर्व गोंधळ संपेल : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील कथित सत्तासंघर्षाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या काल संध्याकाळी दिल्लीला गेले असून सकाळी पक्षाच्या …

Read More »

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोरदार विरोध दर्शविला आहे. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी आणि केकेकोप्प गावांतील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी केआयडीबी विशेष भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत प्रकल्पाविरोधात लेखी आक्षेप नोंदविले. विशेष भूअधिग्रहण अधिकारी मंजुनाथ डोंबर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक …

Read More »

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांच्या वतीने हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करत याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर तसेच बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांना खानापूरचे तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात …

Read More »