बेंगळुरू : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी ‘झीरो एफआयआर’ दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. हा केवळ अपघात नसून एक “मोठा गुन्हेगारी कट” असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तक्रार …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकासाठी राज्य सरकारने मागितला अधिक वेळ
सदस्य संख्या पुनर्नियोजनासाठी मुदतीची उच्च न्यायालयाला विनंती बंगळूर : राज्यातील ग्रामपंचायतींमधील विद्यमान लोकसंख्येनुसार सदस्यसंख्या पुनर्नियोजन करण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केली. राज्यातील मुदत संपलेल्या ५,९५० ग्रामपंचायती आणि १८७ शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत पार पाडण्यासाठी अंतिम आरक्षण अधिसूचना तातडीने जाहीर करण्याचे …
Read More »निपाणी नगरपालिकेत १२ व्या शतकातील देवर दासीमय्यरवर यांची जयंती साजरी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात नगरपालिकेतर्फे १२ व्या शतकातील महान काव्यरचनाकार, राज्यातील महान संत देवर दासीमरय्यवर यांची जयंती साजरी करण्यात आली टाऊन प्लँनिग अध्यक्ष संयोजीत ऊर्फ निकु पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र शिंदे यांचे हस्ते प्रतिमा पुजन झाले. नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी, १३ व्या …
Read More »निपाणीत रामनवमीच्या भक्तीचा जागर
शहरात भगवे ध्वज, पताकांची सजावट; शोभायात्रेची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : चैत्र महिन्याच्या आगमनाने निपाणी नगरीत भक्तीचा सुगंध दरवळू लागला आहे. रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. येथील राम मंदिरासह श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. रामनवमीनिमित्त येथील धर्मवीर संभाजीराजे चौकासह शहरात विविध ठिकाणी भगव्या पताका लावून सजावट करण्यात …
Read More »‘भाकरीच्या चंद्राला’ यंदा महागाईचा डाग
ज्वारी ४० ते ५० रुपये किलो; उत्पादन क्षेत्र घटल्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामात उत्पादनातील घटीमुळे ज्वारी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. गतवर्षे २८०० ते ३००० रुपये क्विंटल मिळणाऱ्या ज्वारीचे दर आता ४००० ते ४५०० रुपयावर पोहचल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील भाकरी गायब होण्याची वेळ आली आहे. या दरवाढीमुळे ‘भाकरीचा चंद्र’ …
Read More »भरधाव जाणाऱ्या कारच्या धडकेने बालकाचा मृत्यू, आई गंभीर जखमी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाल्मिकी नगरमध्ये झालेल्या अपघातात बालक जागीच ठार तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. संकल्प सचिन कोळी (रा. अब्दुलला, ता. शिरोळ) असे मृत बालकाचे नाव तर कविता कोळी या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. घटनास्थळावरून …
Read More »गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या बस स्थानकाच्या भिंती
दंडात्मक कारवाईची मागणी ; निपाणीतील प्रवाशांना दुर्गंधीचा सामना निपाणी (वार्ता) : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या येथील बसस्थानक परिसरात जिकडे-तिकडे गुटखा आणि तंबाखू खाऊन थुंकल्याचे दिसून येत आहे. या बस स्थानकाच्या भिंती तंबाखूयुक्त गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. येथे येणाऱ्या महिला विद्यार्थिनी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी निपाणी …
Read More »शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अन्न व्यवस्था धोक्यात
रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार; निपाणीतील बैठकीत सरकारला इशारा निपाणी (वार्ता) : गॅस व इंधनाची टंचाई भासल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पण भविष्यात अन्नदाता शेतकरीच संपावर गेला तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सर्वत्र आहाकार माजेल, असा इशारा कर्नाटक …
Read More »जूनपासून १० हजार अंगणवाडी केंद्रात एलकेजी-यूकेजी वर्ग
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; कार्यकर्त्यांच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने तोडगा बंगळूर : राज्यातील दहा हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये येत्या जून महिन्यापासून एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू करण्यात येणार असून, अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या विविध मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने …
Read More »शहरी भागात दर २५ दिवसांत, ग्रामीण भागात ४० दिवसांनी सिलेंडरचा पुरवठा
व्यावसायिक वापरकर्त्यांना गेल नोंदणी अनिवार्य: राज्य सरकार बंगळूर : राज्यात निर्माण झालेल्या तीव्र एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरकर्त्यांनी आपल्या नेहमीच्या वापराच्या केवळ २० टक्के गॅसमध्येच कामकाज चालवावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांनी सोमवारी दिले. गॅस सिलेंडरच्या प्रश्नासंदर्भात आज अन्न विभागाच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta