Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

बंगळुर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’ १८१ प्रवासी सुरक्षित

  बंगळूर : एअर इंडियाच्या दिल्ली-बंगळुर उड्डाणादरम्यान गुरुवारी सकाळी गंभीर प्रकार घडला. दिल्लीहून बंगळुरकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय २६५१ या विमानाला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना ‘टेल स्ट्राइक’चा सामना करावा लागला. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या …

Read More »

नीट रद्द करून राज्यांना परीक्षा घेण्याचा अधिकार द्या

  नीट घोटाळ्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन; पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी बंगळूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज बंगळुरात मोठे आंदोलन छेडले. युवक काँग्रेसच्या वतीने फ्रीडम पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात मुख्यमंत्री सिध्दरामय्या, काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह …

Read More »

बकरी ईदनिमित्त निपाणी बकरी बाजार तेजीत

  महागाई, इंधन दरवाढीमुळे किमतीत ‘उसळी’ निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने शहरात विविध प्रकारच्यातयारीला वेग आला असून, कुर्बानीसाठी बोकडांना मागणी वाढली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे वाढलेले इंधन दर आणि एकूणच महागाईचा फटका यंदा बकरी बाजाराला बसला आहे. परिणामी बकरी, बोकडांच्या …

Read More »

अंतर्गत सुरक्षा, गुप्तचर विभागात निवड झाल्याने निकिता कांबळे हिचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : ममदापूर येथील निकिता अनिल कांबळे हिची अंतर्गत सुरक्षा व गुप्तचर विभागात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार सोहळा पार पडला झाला. या सोहळ्यास सहकार रत्न उत्तम पाटील यांनी उपस्थित राहून निकिताचा सत्कार केला. अमोल आवटे यांनी‌ स्वागत केले. उत्तम पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या पदांवर …

Read More »

लोकप्रतिनिधी, आयुक्तांच्या गलथान कारभारामुळेच घरकुल प्रश्नी गोंधळ

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; रक्कम भरलेल्यांना घरकुल मिळणारच निपाणी (वार्ता) : राजीव गांधी घरकुल आणि प्रधानमंत्री आवास योजनेत येथील १८१२ लाभार्थ्यांची यादी आहे. ही यादी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने राजकारण विरहित केली आहे. पण लोकप्रतिनिधींच्या अट्टाहासामुळे लाभार्थींना घरकुलापासून दूर राहावे लागले आहे. शिवाय …

Read More »

सरदेसाई यांच्याकडील दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा डिजीटाइज होणार?

    केंद्र सरकारने “ज्ञान भारतम्” योजनेअंतर्गत दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी विविध संस्थांना, मठांना, विद्यापीठांना तसेच खासगी संग्राहाकांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. खानापूरातील मराठी साहित्याचे जाणते अभ्यासक व म. ए. समितीचे दिवंगत नेते कै. उदयसिंग दत्ताजीराव सरदेसाई यांनी आपल्या आवडीतून गोळा केलेल्या त्यांच्या …

Read More »

फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या

  भूमी वात्सल्य संस्थेचे आवाहन : सिडबॉल निर्मितीचा उपक्रम निपाणी (वार्ता) : सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या येथील भूमी वात्सल्य संस्था आणि सृष्टी पर्यावरण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने फळ आणि झाडांच्या बिया एकत्रित करून त्याचे ‘सीड बॉल’ बनवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे ‘तुम्ही भरपूर फळ खा, बिया …

Read More »

बोरगाव अरिहंत उद्योग समूहातर्फे समाधी मठ गोशाळेला सहा टन चाऱ्याची देणगी

  निपाणी( वार्ता) : उन्हाळ्यात चारा पाण्याची टंचाई भासत असून जनावरांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्री वीरुपाक्षलिंग समाधी मठातील गो शाळेला बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहा टन चाऱ्याची देणगी देण्यात आली. मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते चारा दान …

Read More »

अधिक मासानिमित्त निपाणी परिसरात जावईबापूंच्या आदरातिथ्याची लगबग

    निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या अधिक मासानिमित्त सध्या निपाणी परिसरात घरोघरी जावईबापूंच्या आदरातिथ्याची लगबग सुरू आहे. या महिन्यात जावयाला आंब्याच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद देत विविध प्रकारचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार जावयाला विष्णूरूप मानून घरी जेवण देण्यासह आर्थिक कुवतीनुसार तांब्याचे …

Read More »

डी.जे., डॉल्बीला फाटा, शिक्षण चळवळीचा जागर; शिरगुप्पीत सामाजिक प्रबोधनाचा मेळावा

    निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथील सिद्धार्थ तरुण मंडळा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक प्रबोधन, शिक्षण, संविधान जागृती आणि परिवर्तनवादी विचारांचा संदेश देण्यात आला. याशिवाय डी.जे., डॉल्बीला फाटा घेण्याचा निर्णय घेऊन शिक्षण चळवळीचा जागर करण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून दंगलकार …

Read More »