Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

बोरगाव येथे दिव्यांगांना लसीकरण

निपाणी : बोरगाव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. ही लाट ओसरावी यासाठी महिला व बाल विकासमंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून निपाणी मतदारसंघात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. शिवाय इतर सोयी सुविधा पुरवित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करीत असल्याचे ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील यांनी …

Read More »

कोविड लससाठी खानापूर तालुका राज्य सरकारी नोकर संघाच्यावतीने निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : कोविड लस देण्यासंदर्भात कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ खानापूर तालुका संघटनेच्यावतीने तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे याना गुरूवारी दि. १० रोजी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे. की, सरकारी नोकरासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी खास कोविड लसीचे कॅप पुढील आठवड्यात आयोजन करण्यात यावे.यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यानी …

Read More »

रोहयो योजनेअंतर्गत भुरूनकी ग्राम पंचायतीच्यावतीने होणार रोप लागवड

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या रोहयो योजनेअंतर्गत भुरूनकी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीत हजारो रोपाची लागवड करण्यासाठी खड्डे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र कामे बंद आहेत. नागररिकांना कामे मिळणे कठीण आहे. तेव्हा भुरूनकी गावाच्या नागरिकांना उद्योग खात्री योजनेअंतर्गत कामे मिळावी यासाठी रोप लागवड योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे.यासाठी …

Read More »

मिराशी वाटरे ग्रामस्थांचे तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मिराशी वाटरे गावच्या नागरिकांनी कचरा डेपो विरोधात तहसीलदाराना निवेदन सादर केले.मिराशी वाटरे सर्वे नंबर ८ मधील गायरानमध्ये मोहिशेत ग्राम पंचायतीच्यावतीने कचरा डेपोचे नियोजन करण्यात येत आहे. याला मिराशी वाटरे ग्रामस्थांचा विरोध असून याठिकाणी कचरा डेपो होऊ देणार नाही, असे निवेदन मिराशी वाटरे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर …

Read More »

सँबो युनियन ऑफ एशियाच्या जनरल सेक्रेटरीपदी रघुनाथ शिंत्रे

निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा : देशभरातून एकमेव निवड निपाणी : सँबो युनियन ऑफ एशियाची बैठक ताश्कंद येथे पार पडली. त्यामध्ये युनियनच्या जनरल सेक्रेटरीपदी निपाणी येथील मेस्त्री गल्लीतील रहिवासी रघुनाथ शिंत्रे यांची संपूर्ण भारतातून एकमेव निवड झाली आहे. त्यामुळे निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रे हे सध्या गोवा येथे …

Read More »

खानापूर युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण

खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण करण्यात आले.मास्क वितरणावेळी सीमालढ्यातील जेष्ठ कार्यकर्ते गोपाळ हेब्बाळकर यांनी खानापूर युवा समितीतर्फे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले, तसेच यापुढे खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषिक व युवकांनी एकत्र येत सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे मत व्यक्त केले.गावातील सर्व नागरिकांना …

Read More »

लोंढ्यात सापडलेल्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा ता. खानापूर येथे ३ जून रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या बेवारस इसमाला खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारांती मृत्यू झाला. त्यानंतर इसमाच्या मृत्यूची ओळख पटविण्यासाठी बेळगाव येथील शवगृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पोलिसांनी बेवारस मृत्यूदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कदंबा फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस …

Read More »

चक्क 366 किलो गांजा पोलिसांनी जाळला

बेळगाव : बेळगाव शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. 77 घटनांमध्ये जप्त केलेला हा गांजा कडोली गावाजवळील गुंजेनहट्टीजवळ जाळण्यात आला. जप्त गांजा जाळण्यासाठी जेसीबीने खड्डा खणला आणि त्यात तो 366 किलो कोरडा गांजा जाळला.बेळगाव शहर पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी सीआर …

Read More »

अथणीत पोलिसांची धडक कारवाई; दहा अट्टल दरोडेखोरांना केलं जेरबंद

अथणी (बेळगाव) : अथणी, कागवाड, रायबाग, हारुगेरी व जमखंडी तालुक्यात विविध ठिकाणी दरोडा टाकलेल्या दहा अट्टल दरोडेखोरांच्या टोळीस अथणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. 11) जेरबंद केले. त्यांच्याकडून 4.70 लाखाचा ऐवजही जप्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, अनेक दिवसांपासून या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे पडले होते. अथणी तालुक्यातील रेडरहट्टी व रायबाग …

Read More »

बोरगांव भटक्या कुटुंबीयांना ‘अरिहंत’चा आधार

20 पेक्षा अधिक कुटुंबांना आहार धान्य किट  : सामाजिक बांधिलकीतून उपक्रम निपाणी : लाॅकडाउनमुळे गेल्या वर्षभरापासून घरात बसून राहिलेल्या बोरगांव शहरातील सुमारे वीसहून अधिक भटकी जाती-जमाती कुटुंबांना अरिहंत उद्योग समूहाने जीवनावश्यक वस्तूचे कीट वितरण करून त्यांना आधार दिला आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून अरिहंतने जोपासलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बोरगांव शहरामध्ये सुमारे …

Read More »