पडलिहाळ येथे रयत संघटना शाखा उद्घाटन निपाणी (वार्ता) : जगाचा पोशिंदा हा शेतकरी असून या शेतकऱ्याच्या वर कोणता ही अन्याय, अत्याचार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त …
Read More »शेतीवाडीच्या रस्त्याने शेतकरी सुखावला : निखिल कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) : राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी हुक्केरी मतक्षेत्रातील सर्वाधिक शेतवाडी रस्ता निर्माणचे काम केल्यामुळे शेतकरी सुखावल्याचे हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती यांनी सांगितले. ते गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता कामांचा शुभारंभ करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता निर्माण कामामुळे येथील शेतकऱ्यांची …
Read More »मतिमंद मुलांचे जीवन आदर्शवत : मंजुनाथ गड्डेण्णावर
संकेश्वर (प्रतिनिधी) : मतिमंद मुलांच्या जिवनात आनंदाची बहार येऊ दे, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, असे दैनिक मनध्वनीचे संपादक मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी सांगितले. त्यांनी आपला वाढदिवस निपाणी येथील नितिशकुमार कदम यांच्या मतिमंद मुलांच्या वस्तीशाळेत उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी मतिमंद मुलांना केक बिस्कीट वाटप करुन त्यांना स्नेहभोजन दिले. …
Read More »संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचा बहुमान कोणी दिला?
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचे दुसरे पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरसेवकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परवा पालिकेच्या मासिक सभेत नगरसेवकांनी थेट मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचा बहुमान कोणी दिला. असा प्रश्न विचारला.गावात स्वच्छतेच्या नावे लोकांत शिमगा सुरू असताना पालिका स्वच्छतेच पुरस्कार मिळविणारी ठरली आहे. गावात कोठेच स्वच्छता नसल्याचा …
Read More »सैन्यात भरती झालेल्या सिंगीनकोप शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
खानापूर (प्रतिनिधी) : सैन्यात भरती होऊन देशाचे संरक्षण करून आलेल्या सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी सिध्देश्वर केप्पना मादीहाळ हा भारतीय सैन्यातील आयटीबीपीमध्ये भरती होऊन देशाच्या बाॅर्डवर सेवा बजावून प्रथमच आपल्या सिंगीनकोप गावी शनिवारी आला. त्यानिमित्ताने सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत भारतीय सैनिकाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात …
Read More »खानापूर कृषी खात्याच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कृषी खाते आणि खानापूर तालुका कृषी खात्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला मार्गदर्शन व सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तज्ञ डॉ. एस. एस. हिरेमठ, डॉ. आर. बी. सुतगुंडी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. …
Read More »संकेश्वरात मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नवी गल्ली येथील युवक शिवानंद राजू शिडल्याळी (वय २३) यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आज गौरी ओढ्यातील वृक्षाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवानंद मानसिक त्रासाने अस्वस्थ होता. त्यातच त्याला फिटस आजाराने बेजार केले होते. तो सध्या येथील आझाद रस्ता इंद्रभवन …
Read More »खानापूर ता. पं. कार्यालय कार्यनिर्वाहक अधिकारीविनाच
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभळणारे तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी पद गेल्या काही महिण्यापासून रिक्तच आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयाबरोबरच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयातील कामकाज तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कामकाज ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची गैर सोय होय. खानापूर …
Read More »निपाणीत चोरट्यांचे डेरिंग वाढले; पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे घर फोडले
निपाणी : निपाणी शहर उपनगर व परिसरात गेल्या तीन महिन्यापासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे घर फोडून रक्कम व ऐवज लांबवला. याशिवाय अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये माजी सैनिकाच्या घराचाही समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात निपाणी शहर व उपनगरात 40 घरफोड्या झाल्या आहेत. …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीत एकीची वज्रमुठ!
4 एप्रिलपासून पुनर्रचना प्रक्रिया सुरू खानापूर : खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी घडली. गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकीपासून पुनर्रचनेला सुरुवात होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta