Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

हलगा ता. खानापूर येथे राजा शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी

  खानापूर : हलगा ता. खानापूर येथे दि. १९ फेब्रुवारी राजा शिवछत्रपती महाराजांची जयंती गावातील ग्रामस्थ व माता भगिनी व शिवप्रेमी युवक- युवती यांच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्लापा कृष्णाजी पाटील मेरडा, विनोद मनोहर वीर घोटगाळी, अप्पाना कल्लाप्पा फटाण, रणजित पाटील ग्राम पंचायत सदस्य, सुनिल पाटील ग्राम …

Read More »

नेतृत्व बदलावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण

  बंगळूर : राज्यातील नेतृत्व बदलाचा विषय काँग्रेस हायकमांडने घ्यायचा आहे, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी व्यक्त केले. नेतृत्व बदलाबाबतच्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राज्याच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः सत्ताधारी काँग्रेस पक्षात, या वर्षाच्या अखेरीस “आळीपाळीने मुख्यमंत्री” किंवा “सत्ता वाटप” सूत्रानुसार मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा …

Read More »

३ मार्चपासून अधिवेशन, सात मार्चला अर्थसंकल्प

  बंगळूर : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होईल आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या ७ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. आज विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होईल आणि ते ७ मार्च रोजी विधानसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपाल थावरचंद गेहलोत …

Read More »

खानापूर तालुका मल्टीपर्पज को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी धनश्री सरदेसाई जांबोटीकर तर व्हा. चेअरमनपदी रामचंद्र खांबले यांची निवड

  खानापूर : खानापूर तालुका मल्टीपर्पज को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची तिसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच व्हा. चेअरमनपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. रामचंद्र कृष्णाजी खांबले यांची निवड करण्यात आली. सुचक म्हणून …

Read More »

सीमाप्रश्नी निपाणीत २५ ला धरणे; साहित्य संमेलनात ठरावाची मागणी

  निपाणी : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व जागृतीसाठी २५ फेब्रुवारीला येथील नरवीर तानाजी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्धार येथील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी घेतला. येथील मराठा मंडळ संस्कृतिक भवनात आज महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत विविध महत्त्वाचे ठराव करण्यात …

Read More »

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; म्हैसूर येथील घटना

  म्हैसूर : म्हैसूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला आहे. ही घटना म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये घडली. चेतन आणि रुपाली हे दाम्पत्य, वृद्ध महिला आणि एका मुलासह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. आधी आत्महत्येचा कट रचलेल्या चेतनने तीन जणांना विष पाजून नंतर स्वतः …

Read More »

सदलग्यात उद्या छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण

  कामगार मंत्री संतोष लाड यांची उपस्थिती सदलगा : सदलगा येथील छ. शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा अनावरण सोहळा १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होत आहे. याच दिवशी सकाळी समस्त हिंदू महिलांकडून झांजपथकाच्या दणदणाटात अंबिलकलश, जलकलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी होमहवनादी कार्यक्रम …

Read More »

काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व निर्माण होईपर्यंत सिद्धरामय्या अपरिहार्य

  सतीश जारकीहोळी यांची सिध्दरामय्यांसाठी फलंदाजी बंगळूर, ता. १५: काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व तयार होईपर्यंत सिद्धरामय्या अपरिहार्य आहेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. ते शनिवारी बंगळुरमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, जर कॉंग्रेसला पुढील निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांना सिद्धरामय्या यांची गरज आहे, असे सांगून …

Read More »

हुक्केरी येथे १९ रोजी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण

  हुक्केरी : शहरातील बेळगाव रोडवर असणाऱ्या हळदकेरी भागात येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण दि. १९ फेब्रुवारी होणार असून हुक्केरी शहरात वातावरण शिवमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी या कामी विशेष परिश्रम घेतले आहे. …

Read More »

व्होल्वोकडून राज्यात १,४०० कोटीची गुंतवणूक

  करारावर स्वाक्षरी; जागतिक गुंतवणूकदार परिषदेस वाढता प्रतिसाद बंगळूर : बस आणि ट्रकच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वीडिश-आधारित व्होल्वोने होस्कोटमधील त्यांच्या उत्पादन प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी १,४०० कोटी रुपये गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अधिकृत निवासस्थान ‘कावेरी’ येथे गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत या संदर्भातील करारावर स्वाक्षरी …

Read More »