बेळगाव : बेळगाव शहर तसेच परिसरात घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी काल गुरुवारी एका अट्टल दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्या जवळून लाखो रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजित वसंतराव बजंत्री (वय १९) राहणार अळणावर या तरुणाला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली …
Read More »जय भारत फाउंडेशन, बेळगावतर्फे येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेला संगणक देणगी
विद्यार्थ्यांसाठी नवे तांत्रिक पाऊल येळ्ळूर : आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून जय भारत फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी येळ्ळूर येथील शाळेला तब्बल 10 संगणकांची देणगी प्रदान करण्यात आली. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमात येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष …
Read More »बेळगावच्या ऐतिहासिक सोन्या मारुती मंदिरात कार्तिकोत्सव
बेळगाव : बेळगावातील ऐतिहासिक आर.टी.ओ. क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौकातील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात कार्तिक महिन्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावकरांचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात गेल्या सुमारे १५० वर्षांपासून कार्तिकोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही हा कार्तिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत …
Read More »राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप -2025 मध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचे नेत्रदीपक यश
बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगावच्या पॅरा अर्थात दिव्यांग जलतरणपटूंनी हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या 25 व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप -2025 या प्रतिष्ठेच्या जलतरण स्पर्धेवर वर्चस्व गाजवताना 37 सुवर्ण पदकांसह एकूण 59 पदके जिंकत नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. तसेच कर्नाटक राज्याला सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवून देण्यात …
Read More »बेळगावात जनावरांना ‘लाळ खुरकत’चा धोका; सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीत सरकार आणि पशुसंवर्धन विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी आज आंदोलन छेडत विविध मागण्या मांडल्या. जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबे उपजीविकेसाठी पूर्णपणे पशुधनावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत विभागाचे दुर्लक्ष आणि सरकारच्या विलंब धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. बेळगावमधील शेतकरी या सरकारी …
Read More »ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील येल्लमावाडी गावात ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव रामप्पा निंगप्पा सावळगी (४०) असे आहे. अमावस्येनिमित्त यल्लमा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. सावळगी-अथणी राज्य महामार्गावर काम सुरू असताना, ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जवळच असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला …
Read More »हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 11 डिसेंबरला बेळगावात शेतकऱ्यांचे महाआंदोलन
बेळगाव : 8 डिसेंबर पासून सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना कर्नाटक राज्य रायता संघ आणि हसरू सेना यांनी 11 डिसेंबर रोजी बेळगावात भव्य शेतकरी आंदोलनाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असून यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना …
Read More »तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शनिवारी
बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर देण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत विचार विनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दिनांक २२ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात …
Read More »श्री. व सौ. लक्ष्मीबाई कोंडुस्कर प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधाम रथामुळे झाली सामान्यांची सोय
चोवीस तास मोफत शववाहिका उपलब्ध : ग्रामीण भागातही मिळतेय सेवा बेळगाव : महिना भरापूर्वी म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीराम सेना हिंदुस्थान आणि श्री. व सौ. लक्ष्मीबाई कोंडुस्कर प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधाम रथाचे लोकार्पण करण्यात आले. या रथामुळे गरीब आणि सामान्य लोकांची सोय झाली असून या मोफत सेवेचे कौतुक होत आहे. आता …
Read More »येळ्ळूर शिवाजी रोड- मारुती गल्ली कॉर्नर येथे विद्युत बोअरवेल मंजूर
बेळगाव : येळ्ळूर येथील वॉर्ड नंबर 4 व 5 मधील शिवाजी रोड मारुती गल्ली कॉर्नर येथील बोअरवेल गेली कित्येक वर्षे हॅन्डपम्प असल्याने वारंवार बंद पडत होती. यामुळे शिवाजी रोड दुकान मालक व स्थानिक नागरिकांनी वॉर्ड क्रमांक 4 चे विद्यमान सदस्य व ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta