Monday , September 21 2026
Breaking News

शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे २८ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस निमित्त कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळ संघाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दरवर्षीप्रमाणे मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर्षीचा मराठी भाषा गौरव दिवस २८ फेब्रुवारी रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करून साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
‘मराठी भाषा आणि अभिजातपण’ या विषयावर बोलण्यासाठी मिरज येथील प्रसिद्ध कवी आणि समीक्षक चंद्रकांत बाबर यांना आमंत्रित करण्याचे ठरले.
तसेच वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्यात आली असून दर महिन्याला बेळगावातील एका कवीला समजून घेण्यासाठीचा उपक्रम याहीपुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
यावेळी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर, सचिव सुधाकर गावडे, व्ही. एस वाळवेकर, उर्मिला शहा, रेखा गद्रे, अस्मिता आळतेकर, स्मिता किल्लेकर, अस्मिता देशपांडे, प्रा. निलेश शिंदे, जितेंद्र रेडेकर, ऍड. नितीन आनंदाचे, चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *