Monday , September 21 2026
Breaking News

इतिहास संशोधक केतन पुरी यांचा विशेष कार्यक्रम प्रथमच बेळगावात

Spread the love

 

बेळगाव : इतिहासप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी जीवनपटाचा सखोल उलगडा करणारा इतिहास संशोधक केतन पुरी यांचा विशेष कार्यक्रम प्रथमच बेळगावात आयोजित करण्यात आला आहे. येत्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता लोकमान्य रंगमंदिर, बेळगाव येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ घटनांचा संच नसून तो स्वराज्य, धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्राभिमान यांचा जाज्वल्य आदर्श आहे. या महान इतिहासाला अभ्यासपूर्ण संदर्भांसह, प्रभावी मांडणी आणि जिवंत सादरीकरणातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. इतिहास संशोधक केतन पुरी हे रायगड प्राधिकरणाचे सदस्य असून ‘मऱ्हाटा पातशहा’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांना संपूर्ण महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद लाभत असून अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम गाजले आहेत.
विशेष म्हणजे, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनीही केतन पुरी यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास आणि सादरीकरण या दोन्ही बाबतीत त्यांची विश्वसनीयता अधोरेखित होते. महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, राजकारणातील दूरदृष्टी आणि युद्धनीती यांचा प्रभावी आढावा या कार्यक्रमात घेतला जाणार आहे.
बेळगावकर इतिहासप्रेमींनी ही सुवर्णसंधी नक्की साधावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी पियूष हावळ (९७४२८१४०२०) यांच्याशी संपर्क साधावा.
बेळगावात इतिहासाचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची ही दुर्मिळ संधी आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जवळून जाणून घेण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *