बेळगाव: बेळगाव शहरातील माळमारुती पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कणबर्गी येथील सेंच्युरियन क्लबजवळ मटका घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव नागराज यल्प्पाला तळ्ळूर असे आहे. तो सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या मटका नंबरवर जनतेकडून पैसे वसूल करून ओसी जुगार खेळत होता. याबाबतच्या विशिष्ट माहितीच्या आधारे, माळमारुती पोलिस …
Read More »उत्सव काळात जनतेला सुविधा द्या : आमदार आसिफ सेठ यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : श्रावण महिना सुरू होताच, सणांची मालिका येते. विशेषतः बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज रविवार दि. २० रोजी आमदार आसिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागात फेरफटका मारून कामाची पाहणी केली. गणेशोत्सव जवळ येत असल्याने बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी फोर्ट रोडवरील …
Read More »बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई: २३.८४० किलो गांजा जप्त
बेळगाव : बेळगावच्या उद्यमबाग पोलिसांनी मोठी कारवाई करत २३.८४० किलो गांजा जप्त केला असून तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. उद्यमबाग पोलिस स्टेशनचे पीआय डी.के. पाटील यांनी मोठी कारवाई करत शहरात गांजा विकणाऱ्या तीन जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून १० लाख रुपये किमतीचा २३.८४० किलो गांजा जप्त करण्यात आला. …
Read More »युवा समिती सिमाभागच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची उद्या घेणार भेट..
बेळगाव : कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नडसक्तीचा फतवा निघाला. त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नडसक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने रविवार दिनांक 20 रोजी बेळगाव जिल्ह्याचे …
Read More »वडगांव श्री मंगाई यात्रेत पशुबळी देण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
बेळगाव : वडगाव येथे 22 जुलै रोजी होणाऱ्या मंगाई देवी यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी।मोहम्मद रोशन यांनी शनिवारी बजावला आहे. पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य प्राणी बळी कायदा 1959 नियम 1963 अन्वये देवाच्या नावावर …
Read More »डीसीपी पदी बढती मिळाल्याबद्दल एन. बी. बरमनी यांचा सन्मान!
बेळगाव : बेळगाव शहराचे लोकप्रिय पोलिस अधिकारी एन. बी. बरमनी यांची बेळगाव शहराच्या डीसीपी पदी बढती झाल्याबद्दल बेळगाव शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विविध वित्त संस्था, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बरमनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना नवनिर्वाचित डीसीपी एन. बी. बरमनी म्हणाले की, मी माझ्या पोलिस …
Read More »बेळगाव महानगरपालिकेकडून पत्रकारांना आरोग्य विमा कार्डचे वाटप
बेळगाव : बेळगाव महापालिकेकडून पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मंगेश पवार यांनी दिली. शनिवारी बेळगावच्या महापौर कार्यालयात पत्रकारांना आरोग्य विमा कार्डचे वाटप करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना महापौरांनी, सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन …
Read More »‘श्री योग हेल्थ फिटनेस सेंटर’चे उद्घाटन
बेळगाव : शहापूर लायन्स चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने भाग्यनगर, दुसरा क्रॉस येथे ‘श्री योग हेल्थ फिटनेस सेंटर’ या नवीन केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले. गोमटेश विद्यापीठ, बेळगावचे अधिष्ठाता आणि माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी शहापूर लायन्स चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांनी समाजाच्या आरोग्याच्या …
Read More »राजलक्ष्मी चिल्ड्रेन फाउंडेशनचा महत्वाचा टप्पा; १०००वा विद्यार्थी दाखल, ६७ विद्यार्थ्यांना टॅब व शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : चिक्कोडी शिक्षण विभागातील ६७ होतकरू आणि वंचित पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना राजलक्ष्मी चिल्ड्रन फाउंडेशन (RCF) या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने टॅब आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आयोध्यानगर, कोल्हापूर सर्कलजवळील फाउंडेशनच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. याच वेळी, फाउंडेशनच्या प्रमुख ‘प्रतिभा पोषक’ उपक्रमांतर्गत १०००व्या विद्यार्थ्याची नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे …
Read More »नशेच्या धुंदीत युवकाची कंग्राळीजवळ मार्कंडेय नदीत उडी!
बेळगाव : बेळगावमध्ये एका युवकाने दारूच्या नशेत नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. ही घटना बेळगाव तालुक्यातील कंग्राळीजवळ मार्कंडेय नदीत घडली असून, स्थानिक पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. कंग्राळी गावातील सचिन माने या युवकाने दारूच्या नशेत मार्कंडेय नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी दारूची बाटली, पाण्याची बाटली आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta