बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये खुली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. उच्च शिक्षणात मिळणाऱ्या सवलतींप्रमाणेच प्राथमिक विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तज्ञ समितीच्या बैठकीदरम्यान …
Read More »शांताई विद्या आधारची गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कास मदत
बेळगाव : गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत करणाऱ्या शांताई विद्या आधार या गटाने आपले कर्तव्य पुन्हा एकदा पार पाडताना नवज्योत टेक्नॉलॉजीसच्या मदतीने शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर शाळेतील दोन गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क अदा केले. ज्ञान मंदिर शाळेतील एका छोट्या कार्यक्रमात शांताई विद्या आधारचे सदस्य ॲलन विजय …
Read More »आशादीपतर्फे आई-वडिलांचा आधार नसलेल्या मुलाला शिक्षणासाठी आधार
येळ्ळूर : महावीर नगर उद्यामबाग येथे भाड्याच्या घरामध्ये आजी सोबत राहणाऱ्या व आई-वडील असून देखील गेल्या चार वर्षापासून आजीकडे सोडून गेलेल्या मुलाला आशादिप वेल्फेअर सोसायटीतर्फे 5000 व शैक्षणिक साहित्य बरोबरच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. वास्तविक पाहता या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या आजी ऑफिसमध्ये फरशी पुसण्याच्या कामापासून घरोघरी जाऊन भांडी …
Read More »तज्ञ समितीच्या बैठकीत युवा समिती सीमाभागच्या शिष्टमंडळाने दिली सीमाभागात होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती…
बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे …
Read More »कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून टिळकवाडीत महिलेचा खून
बेळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका महिलेचा खून करण्यात आला आहे.गीता रणजीत दावले गवळी (वय 55) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत गीता हीचा दीर गणेश गवळी याने आज सकाळी आठच्या दरम्यान गीता यांच्यावर चाकूचे सपासप वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणामुळे टिळकवाडी …
Read More »सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत बैठक
बेळगाव : सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी उद्या (ता. १०) मुंबई येथे तज्ज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाबाबत योग्य ती माहिती आणि सल्ला देण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक मुंबईतील मंत्रालयात दुपारी तीन वाजता होणार …
Read More »अतिथी प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
बेळगाव : बेळगावमध्ये आज एआयडीएसओच्या नेतृत्वाखाली शासकीय पदवी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी राणी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले. राज्यात पदवी महाविद्यालयांचे चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, सरकारने अतिथी प्राध्यापकांची नियुक्ती न केल्यामुळे शिक्षकांची मोठी कमतरता भासत आहे. परिणामी, नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासकीय पदवी …
Read More »माधवपूर वडगाव बस स्टॉपवरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी पुढाकार
बेळगाव : माधवपूर वडगाव पहिला बस स्टॉप येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने अनेक अपघात घडले आहेत. मंगळवारी सकाळी समाजसेवक येलोजीराव पवार, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुभाष देसाई व आनंद शहापूरकर यांनी या गंभीर समस्येबाबत बेळगाव ट्राफिक पोलिसांना लेखी निवेदन दिले. या निवेदनात बस स्टॉपजवळ स्पीड ब्रेकर बसवणे, …
Read More »भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ विशेष कार्यक्रम अपूर्व उत्साहात
बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ कार्यक्रम संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात रविवारी सायंकाळी अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमांतर्गत विविध शाळांच्या 25 उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 25 विद्यार्थी व 25 विद्यार्थिनी यांनाही यावेळी उत्कृष्ट छात्र …
Read More »अपघाताचा बनाव करून गर्भवती पत्नीचा खून!
कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक गावातील सात महिन्यांची गरोदर असलेल्या चैताली प्रदीप किरणगी (२२) हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिचा पती प्रदीप यानेच तिचा खून केला असल्याचा आरोप चैतालीचे वडील अण्णासाहेब माळी यांनी केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रदीप आणि चैताली एकाच गावाचे रहिवासी. अनेक वर्षांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta