Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

सामाजिक समरसता मंच वतीने भगिनी निवेदिता जयंती साजरी

  बेळगाव : मरगाई मंदिर भांदुर गल्ली येथे गुरुवार दिनांक ६रोजी सामाजिक समरसता मंच वतीने भगिनी निवेदिता जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.अरुणा काकतकर, प्रमुख वक्त्या स्नेहल कालकुंद्री तसेच विधान परिषद सदस्य व सामाजिक समरसता मंच भारतीय टोळी सदस्य श्री. साबण्णा तलवार आणि संघ प्रांत प्रचारक व …

Read More »

बनावट कॉल सेंटर प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी

  बेळगाव : बेळगावमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यानंतर अटक केलेल्या ३३ आरोपींना शुक्रवारी तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बॉक्साईट रोडवरील एका खाजगी इमारतीत हे अवैध कॉल सेंटर ८ मार्च २०२५ पासून …

Read More »

बेळगावात गांजा सेवन आणि मटका जुगारावर पोलिसांचा छापा

  तिघांवर गुन्हे दाखल बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या स्वतंत्र धडक कारवाईत मादक पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर मटका जुगार याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. रुक्मिणीनगर, ५ व्या क्रॉसनजीक माळमारुती पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आनंद …

Read More »

रोशनी बामणे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : चिक्कबळ्ळापूर येथील एम. व्ही. जिल्हा अंतर्गत क्रीडांगण स्टेडियममध्ये सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या मन्नूर व गोजगे शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रोशनी बामणे हिचा प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला असून तिला …

Read More »

आजच्या युगात वधू -वर मेळावे काळाची गरज : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : आधुनिक युगात माणसाची जीवनशैली बदलली आहे. त्याचबरोबर विवाह पद्धतीतही अमुलाग्र बदल झालेले आहेत.आजच्या युगात शैक्षणिक स्तरावर मुलींनी भरीव प्रगती केली आहे.त्यामानाने मुलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी दिसून येते. आणि यातूनच मराठा समाजामध्ये मुला मुलींचे विवाह जुळवताना पालकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. यासाठी वधू वर मेळावे काळाची …

Read More »

“कॅपिटल-वन” एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला रविवारपासून

  बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे. रविवार दि 16-11-2025 पासून रविवार …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे १५ नोव्हेंबर रोजी रोप्यमहोत्सवी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कॉम्रेड कृष्णा मेणसे साहित्य नगरी स्कूल ऑफ कल्चर (गोगटे रंगमंदिर) येथे 25 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. मृणाल निरंजन पर्वतकर …

Read More »

श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर येथे 16 नोव्हेंबर रोजी दिपोत्सवाचे आयोजन

  बेळगाव : श्री ज्योतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगाव येथे रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता दिपोत्सव आयोजन करण्यात आला आहे. दिपोत्सव निमित मंदिर परिसरामध्ये 50001 दिवे लावण्याचा संकल्पना करण्यात आले असून तरी सर्व भक्तानी सहभागी होवून सहकार्य करावे. सायंकाळी 07.00 वाजता महाआरती आयोजित करण्यात आली असून …

Read More »

बेळगाव आणि गोव्यात दहशत माजवणाऱ्या आंतरराज्य साखळी चोरांना बेड्या!

  बेळगाव : बेळगावमध्ये तीन ठिकाणी आणि गोव्यात दोन ठिकाणी साखळी चोरी करून फरार झालेल्या दोन आंतरराज्य साखळी चोरांना पकडण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही आरोपींना जेरबंद करून पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे.बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. गेल्या आठवड्यात बेळगावच्या सर्वोदय …

Read More »

“धूम” सिनेमाच्या स्टाईलने चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

  बेळगाव : बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाच्या धर्तीवर चोऱ्या करून मौजमजा करणाऱ्या एका कुप्रसिद्ध घरफोडी करणाऱ्या चोराला अखेर यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलीस पथकाने सोने, चांदीचे दागिने, रोकड आणि वाहनांसह एकूण ९७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी …

Read More »